Sexual Assault on a Minor Girl : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sexual Assault on a Minor Girl : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Sexual Assault on a Minor Girl : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sexual Assault on a Minor Girl : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sexual Assault on a Minor Girl : नगर : पारनेर (Parner) तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Sexual Assault on a Minor Girl) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिकचा ॲम्बेसेडर; करणार भारताचे प्रतिनिधित्व

यांच्याविरोधात गुन्हा नोंद

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षे १० महिने वयाच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ओम आल्हाट, रोहित चत्तर (पूर्ण नाव माहिती नाही) व यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना जानेवारी २०२६ मध्ये घडल्याचे सांगण्यात आले असून ४ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित गावातील एका ठिकाणी आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल (Sexual Assault on a Minor Girl)

तसेच, आरोपीने पीडितेला धमकावून तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेतली असून रविवारी (ता.२२) रात्री उशिरा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक हंडाळे करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.