Rahuri Police Station : नगर : उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग आला आहे. अशातच जेसीबीच्या ड्रायव्हरने (JCB Driver) चक्क मालकाच्या (Owner) खिशातून ८० हजार रुपये चोरले. तसेच मालकाच्या मुलाला फोनवरून शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) फिर्याद दाखल केली आहे.
नक्की वाचा : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार
जीवे मारण्याची धमकी
राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील ससे-गांधले वस्ती येथे एका जेसीबी चालकाने आपल्याच मालकाच्या घरातून ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरी केल्यानंतर या आरोपीने मालकाच्या मुलाला फोनवरून शिवीगाळ करत शिर्डीच्या पुढे दिसला तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चंद्रकांत मारुती ससे (रा. ससे-गांधले वस्ती, वांबोरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून सागर ज्ञानेश्वर गोसावी (रा. शेतकरी माध्यमिक विद्यालय जवळ, धोंडेवाडी, ता. कोपरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अवश्य वाचा : अहिल्यानगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिकचा ॲम्बेसेडर; करणार भारताचे प्रतिनिधित्व
ससे यांच्या घरात प्रवेश (Rahuri Police Station)
सागर गोसावी हा फिर्यादी चंद्रकांत ससे यांच्या जेसीबी मशीनवर चालक म्हणून काम करत होता. (ता. ६) मार्च दुपारी अडीच ते चारच्या सुमारास, आरोपीने ससे यांच्या घरात प्रवेश केला. घराच्या हँगरला लटकवलेल्या पँटच्या खिशातील ८० हजार रुपये रोख रक्कम चोरून तो पसार झाला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुन्हा दाखल
चोरीच्या घटनेनंतर आरोपीने फिर्यादीचा मुलगा सागर याला फोन केला. फोनवर त्याने शिवीगाळ केली. तू जर मला शिर्डीच्या पुढे कुठे दिसला, तर तुला मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली. या प्रकारानंतर ससे कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. राहुरी पोलिसांनी या प्रकरणी चोरी व जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक कुदळे हे करत आहेत.



