Pathardi Municipal Council : पाथर्डी  नगरपरिषदेत  डिजिटल भरणा प्रणाली 

Pathardi Municipal Council : पाथर्डी नगरपरिषदेत डिजिटल भरणा प्रणाली

0
Pathardi Municipal Council : पाथर्डी  नगरपरिषदेत  डिजिटल भरणा प्रणाली 
Pathardi Municipal Council : पाथर्डी  नगरपरिषदेत  डिजिटल भरणा प्रणाली 

Pathardi Municipal Council : पाथर्डी : पाथर्डी नगरपरिषदेने (Pathardi Municipal Council) शहरातील करदात्यांना कर भरण्यासाठी सुलभ आणि डिजिटल (Digital) व्यवस्था केल्याने नगरपरिषदेने डिजिटल क्रांतीकडे एक पाऊल टाकले आहे. आता लोकांना घरबसल्या एका क्लिकवर मोबाईल द्वारे आपल्या मालमत्तेची व पाणीपट्टीची असलेली करप्रणाली (Tax) भरता येणार आहे त्यासाठी नगरपरिषदेमध्ये हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही.

नक्की वाचा : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार

क्यूआर कोड प्रणालीचा शुभारंभ

 पाथर्डी नगरपरिषद हद्दी मधील मालमत्ता धारकांना घरबसल्या मालमत्ता व पाणी कर भरता यावा यासाठी बँक खात्याशी संलग्न क्यूआर कोड प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते या सुविधेचे लोकार्पण झाले. यामुळे पाथर्डीकरांना आता कॅशलेस पद्धतीने सुलभ आणि सुरक्षित कर भरणा करता येणार आहे.नगरपरिषदेच्या या नव्या उपक्रमामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता येणार आहे. नागरिकांना आता नगरपरिषद कार्यालयात येऊन रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. पूर्वी फक्त रोखीने कर प्रणालीचा भरणा स्वीकारला जात होता. आता मोबाईलद्वारे केवळ क्यूआर कोड स्कॅन करून थेट नगरपरिषदेच्या अधिकृत बँक खात्यात कर जमा करता येणार असल्याने व्यवहार अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहेत.

अवश्य वाचा : अहिल्यानगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिकचा ॲम्बेसेडर; करणार भारताचे प्रतिनिधित्व

डिजिटल पेमेंटचा वापर वाढवण्यावर भर (Pathardi Municipal Council)

पाथर्डी शहराला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने नेण्यासाठी हा डिजिटल उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून वेळेत कर भरून शहराच्या विकासकामांना गती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी मुख्याधिकारी संतोष लांडगे, सोमनाथ नारळकर यांनी या प्रणालीची सविस्तर माहिती देत डिजिटल पेमेंटचा वापर वाढवण्यावर भर दिला. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढून नगरपरिषदेच्या खात्यामध्ये आर्थिक चलन वेळेवर करदात्यांकडून मिळणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांची उपस्थिती

दरम्यान, मागील महिन्यात नगरसेविका मंगल सोनटक्के यांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी डिजिटल सुविधा सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत ही सुविधा कार्यान्वित करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या प्रणालीच्या अनावरण प्रसंगी उपनगराध्यक्षा मंगल कोकाटे, नंदकुमार शेळके, बंडूशेठ बोरुडे, डॉ.शारदा गर्जे, किरण खेडकर, वंदना टेके, बजरंग घोडके, अमोल गर्जे, सुभाष बोरुडे, जगदीश मुने, अजय भंडारी, मनिषा उदमले, वर्षा मोरे, सविता भापकर, मंगल सोनटक्के, रेखा हंडाळ, दिपाली बंग, मुख्याधिकारी संतोष लांडगे,मुख्य लेखापाल सोमनाथ नारळकर, कार्यालयीन प्रमुख विशाल डहाळे, कृष्णा देवढे आदी उपस्थित होते.