Akshay Kardile : भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या : अक्षय कर्डिले 

Akshay Kardile : भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या : अक्षय कर्डिले

0
Akshay Kardile : भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या : अक्षय कर्डिले
Akshay Kardile : भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या : अक्षय कर्डिले

Akshay Kardile : राहुरी : स्व. आमदार कर्डिले (Shivajirao Kardile) साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत तुमचीच सेवा केली. तशीच तुमची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. साहेब गेल्यानंतर जवळपास चार-पाच महिन्यापासून सर्वाच्या सुखदुःखात सहभागी होऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा, तुमची सेवा करण्याचा, तुमची कामे सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. पालकमंत्री नामदार विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांचे आपल्याला मोलाचे सहकार्य लाभत आहे. यापुढेही येणाऱ्या निवडणुकीत तुमचे मार्गदर्शन आणि आशीर्वादाची गरज आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिकचा ॲम्बेसेडर; करणार भारताचे प्रतिनिधित्व

तुमच्या सर्वांवर माझे पुढील आयुष्य अवलंबून

भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशी साथ मला द्या, तुमच्या सर्वांवर माझे पुढील आयुष्य अवलंबून आहे, असे भावनिक आवाहन जिल्हा बँकेचे संचालक राहुरी विधानसभेचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले यांनी केले.राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तांदुळवाडी येथील राहाणे मंगल कार्यालयात शनिवारी (ता.२१) जिल्हा बँकेचे संचालक, युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी वाघाचा आखाडा, तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, मानोरी, वळण, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, पिंप्री, चंडकापूर आदी गावांतील कार्यकर्त्यांशी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संवाद साधण्यासाठी बोलावलेल्या गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार (Akshay Kardile)

यावेळी ११ गावातील विविध कार्यकर्त्यांनी एकमुखीपणे स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहायची असेल तर अक्षय कर्डिले यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्णपणे त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करून विजयी करणार, असा विश्वास व्यक्त केला.