Pravin Ghule : कर्जत तालुक्यातील प्रवीण घुले यांचा भाजपला रामराम; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत केला प्रवेश

0

Pravin Ghule : कर्जत : काँग्रेसमधून भाजपात (BJP) आलेले कर्जतचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले (Pravin Ghule) यांनी सोमवारी भाजपाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपोस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांचा प्रवेश हा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांना मोठा धक्का मानला जात आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या ताब्यात असलेली कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्तांतर घडविण्यात घुले यांचा मोठा हात होता.

Pravin Ghule : कर्जत तालुक्यातील प्रवीण घुले यांचा भाजपला रामराम; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत केला प्रवेश
Pravin Ghule : कर्जत तालुक्यातील प्रवीण घुले यांचा भाजपला रामराम; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत केला प्रवेश

नक्की वाचा : भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या : अक्षय कर्डिले

स्थानिक राजकारणात खळबळ

कर्जतचे प्रवीण घुले यांनी सोमवारी संध्याकाळी भाजपास सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला. अचानक घुले यांनी घेतलेल्या निर्णयाने स्थानिक राजकारणात चांगलाच धक्का बसला. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करणारे प्रवीण घुले यांनी ११ मार्च २०२३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात समर्थकांसह प्रवेश केला होता. राम शिंदे यांनी घुलेंना हाती घेत बाजार समिती यासह नुकतेच कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांची एकहाती आलेल्या सत्तेस सुरुंग लावत सत्तांतर घडवले होते. मात्र अचानक सोमवारी प्रवीण घुले समर्थकांनी सोशल मीडियावर जय महाराष्ट्र स्टेटस लावत कर्जतच्या स्थानिक राजकारणात बदलाचे चित्र स्पष्ट केले होते.

Pravin Ghule : कर्जत तालुक्यातील प्रवीण घुले यांचा भाजपला रामराम; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत केला प्रवेश
Pravin Ghule : कर्जत तालुक्यातील प्रवीण घुले यांचा भाजपला रामराम; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत केला प्रवेश

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राम शिंदेंना मोठा धक्का (Pravin Ghule)

संध्याकाळी साडे आठ वाजता प्रवीण घुले यांनी मुंबईत जात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला. घुलेंचा भाजपातून शिवसेनेत पक्ष प्रवेश करणे राम शिंदेंना मोठा धक्का मानला जात आहे. घुलेंसोबत आणखी कोण-कोण पदाधिकारी गेले याची माहिती समोर आली नसून याचा कर्जत नगरपंचायतीच्या सत्तेवर काय परीणाम हाेणार? हआगामी दिवसांत स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here