Clash Between Two Groups : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव शिवारात दोन गटांत हाणामारीची (Clash Between Two Groups) घटना घडली असून यामध्ये दोघे जखमी (Injured) झाले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नक्की वाचा : भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या : अक्षय कर्डिले
उसने दिलेले पैसे मागितल्याने मारहाण
गुंडेगाव बसस्टँड परिसरात पैशांच्या उधारीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सुरेश फाकट्या चव्हाण (वय ६०, रा. गुंडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश सिध्दीकर चव्हाण, संगिता सिध्दीकर चव्हाण व सिध्दीकर फाकट्या चव्हाण (सर्व रा. गुंडेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून संशयित आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एकाने लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी स्वतः जखमी झाले आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
काठी व दगडांनी मारहाण (Clash Between Two Groups)
तर दुसरी घटना गुंडेगावातील ससा टेकडी परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या विनोद सिध्दीकर चव्हाण (वय २६) यांच्यावर चौघांनी मिळून हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सय्यदलाल फाकट्या चव्हाण, सुरेश फाकट्या चव्हाण, निलेश सय्यदलाल चव्हाण व अश्विनी नीलेश चव्हाण (सर्व रा. गुंडेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संशयित आरोपींनी काठी व दगडांनी मारहाण करत त्यांना जमिनीवर पाडले, तसेच डोळ्यात मिरची पूड टाकून जखमी केले असे फिर्यादीत म्हटले आहे.



