Illegal gas refilling | नगर : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कामरगाव परिसरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग (Illegal gas refilling) करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे दोन कोटी एक लाख नऊ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचा – जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच
सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरला
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व त्यांच्या पथकाने नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली. गुप्त बातमीदारामार्फत पुणे-अहिल्यानगर रस्त्यालगत कामरगाव शिवारातील एका हॉटेल च्या पार्किंगमध्ये तीन एचपी गॅस टॅंकरमधून व्यवसायिक गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता चार जण गॅस रिफिलिंग करताना आढळून आले.
अवश्य वाचा – भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या : अक्षय कर्डिले
दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सचिन आबा बोधले (वय ३१, रा. दहिवडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव), माणिक बालाजी गुट्टे (वय ३२, रा. दैठणे, ता. परळी, जि. बीड), उल्हास जीवन कवडे (रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव), अमृत बाळासाहेब ठोकळ (वय 33, रा. कामरगाव, ता. जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल ५७. २०० टन एचपी कंपनीचा गॅस असा ३० लाख ४८ हजार ५२८ रुपये, ३ गॅस टॅंकर एक कोटी ६५ लाख, गॅस कंपनीचे २० सिलेंडर, असा एकूण दोन कोटी ९ लाख ६२८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा – शिवाजीराव कर्डिलेंचा वारसदार राजकीय आखाड्यात
आरोपी ज्वलनशील पदार्थ हाताळताना कोणतीही सुरक्षा न बाळगता अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा, एलपीजी नियमन आदेश, गॅस सिलेंडर अधिनियम आणि स्फोटक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



