IPL 2026 New Rule : आयपीएल २०२६ साठी बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, ते कोणते ?

0
IPL 2026 New Rule : आयपीएल २०२६ साठी बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, ते कोणते ?
IPL 2026 New Rule : आयपीएल २०२६ साठी बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, ते कोणते ?

IPL 2026 New Rule : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल (IPL) २०२६ चा थरार येत्या २८ मार्चपासून (IPL 2026 New Rule) सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने अखेरच्या क्षणी काही महत्त्वाचे बदल लागू (Rule Change) केले आहेत. या नव्या नियमांमुळे सर्व १० संघांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा संपूर्ण हंगामात थेट परिणाम दिसून येणार आहे. अहवालानुसार, सर्वात मोठा बदल म्हणजे, मॅचच्या दिवशी कोणत्याही टीमला प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली जाणार नाही. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे पिच आणि विकेटची गुणवत्ता टिकवून ठेवणे असेल.

नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यात २५०० बालमृत्यू ; जबाबदार कोण?

आयपीएल २०२६ साठी बीसीसीआयचे ७ मोठे नियम (IPL 2026 New Rule)

१. मॅचच्या दिवशी प्रॅक्टिस बंद असेल – कोणत्याही टीमला मॅचच्या दिवशी ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिस करता येणार नाही.

२. प्रॅक्टिस मॅचवर मर्यादा – प्रत्येक टीमला जास्तीत जास्त २ प्रॅक्टिस मॅच खेळण्याचीच परवानगी असेल. त्यासाठी बीसीसीआयची पूर्वपरवानगी आवश्यक असेल आणि सामना ३.५ तासांपेक्षा जास्त चालता कामा नये.

३ नेट्स शेअरिंग वर बंदी – कोणतीही टीम दुसऱ्या टीमचे प्रॅक्टिस नेट्स वापरू शकणार नाही. प्रत्येक टीमसाठी स्वतंत्र नेट्सची व्यवस्था केली जाईल.

अवश्य वाचा: धर्मांतर केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

खेळपट्टी वापरावर कडक नियम (IPL 2026 New Rule)

४. खेळपट्टी वापरावर कडक नियम – होम टीम ज्या पिचवर पहिला सामना खेळणार आहे, त्या पिचवर ४ दिवस आधीपासून कोणतीही प्रॅक्टिस करता येणार नाही.

५. प्रत्येकवेळी नवीन खेळपट्टी – रेंज हिटिंग, रन-अप आणि इतर ड्रिल्ससाठी वेगळे विकेट्स दिले जातील. तसेच, सलग प्रॅक्टिस करणाऱ्या टीम्ससाठी प्रत्येकवेळी नवीन खेळपट्टी तयार केली जाईल.

६. कुटुंबीयांसोबत प्रवासावर बंदी – खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीय किंवा मित्रांसोबत प्रवास करण्याची परवानगी नसेल. प्रॅक्टिस किंवा मॅचसाठी येणाऱ्या टीम बसमधूनच प्रवास करावा लागेल.

७. LEB बोर्डाजवळ बसण्यास मनाई – खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मैदानावरील LEB बोर्डजवळ बसण्यास बंदी घालण्यात आली आहे.