Parner News : पोलीस-विद्यार्थी संवादातून सुरक्षिततेचा संदेश; जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Parner News : पोलीस-विद्यार्थी संवादातून सुरक्षिततेचा संदेश; जनजागृती कार्यक्रम उत्साहात

0
Parner News : पोलीस-विद्यार्थी संवादातून सुरक्षिततेचा संदेश; जनजागृती कार्यक्रम उत्साहात
Parner News : पोलीस-विद्यार्थी संवादातून सुरक्षिततेचा संदेश; जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Parner News : पारनेर : पारनेर पोलीस ठाण्याच्या (Parner Police Station) वतीने ‘पोलीस दीदी – पोलीस काका’ या उपक्रमांतर्गत कान्हूर पठार (Kanhur Pathar) (ता.पारनेर) येथील जनता विद्या मंदिर विद्यालयात (Janata Vidya Mandir School) जनजागृती कार्यक्रम उत्साहात झाला. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव, आत्मविश्वास व कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

नक्की वाचा : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच

सतर्क राहण्याचे आवाहन

या उपक्रमाविषयी पोलीस अधिक्षक कार्यालय व स्नेहालय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्याशाळा झाली त्यानुसार कान्हूर पठार ग्रामपंचायतीने पारनेर पोलीस ठाण्यास हा उपक्रम घेण्याविषयी निवेदन दिले होते. कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत ‘सेफ टच – अनसेफ टच’, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बालविवाह प्रतिबंध, महिला सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांबद्दल विश्वास व आपलेपणा निर्माण (Parner News)

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले व आपले अनुभव मांडले. पोलिसांनीही विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करत योग्य मार्गदर्शन केले. या संवादातून विद्यार्थ्यांमधील भीती कमी होऊन पोलिसांबद्दल विश्वास व आपलेपणा निर्माण झाला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक रणजीत मारग, पोलीस कर्मचारी सागर धुमाळ, पोर्णिमा कांबळे, सरपंच संध्या ठुबे, डी.सी.व्यवहारे,धंनजय ठुबे, किरण ठुबे, धंनजय व्यवहारे, श्रीकांत ठुबे, प्राचार्य संजय काळे उपस्थित होते.