Dr. Pankaj Ashiya : नगर : नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आपली सर्वोच्च जबाबदारी असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांना आरोग्याच्या सेवा (Healthcare Services) अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण द्याव्यात. मुला-मुलींचे लिंगगुणोत्तर (The Sex Ratio of Boys and Girls) समान राखण्यासाठी अधिक गांभीर्यपूर्वक काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिले.
नक्की वाचा : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच
आरोग्य विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सविस्तर आढावा घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार नेहेरकर, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद काकडे आदी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, (Dr. Pankaj Ashiya)
मुला-मुलींचे लिंगगुणोत्तर कमी असलेल्या गावांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात यावे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत ग्रामस्तरीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा समावेश करून याबाबत जागृती करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात मुला-मुलींच्या लिंगगुणोत्तराचा फलक लावण्यात यावा. रिस्कझोन भागातील संशयित सोनोग्राफी केंद्रांची कसून तपासणी करण्यात यावी. मुला-मुलींचे लिंगगुणोत्तर समान राखण्यासाठी यंत्रणांनी अतिशय गंभीरपणे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील संशयित क्षयरुग्णांचे लवकर निदान व योग्य उपचार होण्यासाठी तपासणीची संख्या वाढवावी. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात यावेत. प्रत्येक तालुक्याला दरमहा देण्यात आलेले तपासण्यांचे उद्दिष्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झाले पाहिजे. ज्या तालुक्यांमध्ये तपासण्यांची संख्या कमी आहे, तेथील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिले.
डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया अशा आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्र आणि मोठ्या गावांमध्ये गृहभेटी सातत्याने करण्यात याव्यात. डास निर्मूलनासाठी कीटकनाशक फवारणी, साचलेले पाणी हटवणे व निर्जंतुकता राखण्यावर भर द्यावा. बैठकीस सर्व आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.



