Leopard Death : श्रीगोंदा : श्रीगोंदा (Shrigonda) शहरालगत असलेल्या भिंगाण आणि टाकळी कडेवळीत गावच्या हद्दीतील विहिरीत पडल्याने एका बिबट्याचा मृत्यू (Leopard Death) झाल्याची घटना आज उघडकीस आली. रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे आणि नाका-तोंडात पाणी गेल्याने वनविभागाच्या (Forest Department) प्रयत्नांनंतरही बिबट्याला वाचवता आले नाही.
नक्की वाचा : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच
घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास अंधारामुळे विहिरीचा अंदाज न आल्याने एक बिबट्या शेतकरी अशोक सोनवणे यांच्या विहिरीत पडला. आज सकाळी जेव्हा सोनवणे आपल्या शेतात गेले, तेव्हा त्यांना विहिरीच्या पाण्यात बिबट्या असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली. विहिरीत बिबट्या पडल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच, बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वनविभागाने विहिरीत पिंजरा सोडून शर्थीचे प्रयत्न केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाण्यातून बाहेर काढण्यापूर्वीच बिबट्याचा मृत्यू (Leopard Death)
बिबट्या रात्रभर पाण्यात होता, त्याच्या नाका-तोंडात तसेच पोटात मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने तो गहाळ झाला होता. वनविभागाच्या पथकाने बाहेर काढण्यापूर्वीच बिबट्याचा पाण्यातच मृत्यू झाला होता. वनविभागाने मृत बिबट्याला विहिरीबाहेर काढून त्याचा ताबा घेतला. त्यानंतर नियमानुसार बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले आणि वनविभागाच्या उपस्थितीत त्यावर दहन विधी पार पडला. रात्रीच्या वेळी शिकार शोधताना किंवा वावरताना विहिरीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.



