Hindu Sammelan : राष्ट्र केंद्रीत समाज निर्माण व्हावा : सुनिल काळे

Hindu Sammelan : राष्ट्र केंद्रीत समाज निर्माण व्हावा : सुनिल काळे

0
Hindu Sammelan : राष्ट्र केंद्रीत समाज निर्माण व्हावा : सुनिल काळे
Hindu Sammelan : राष्ट्र केंद्रीत समाज निर्माण व्हावा : सुनिल काळे

Hindu Sammelan : राहुरी : हिंदू समाजातील (Hindu community) दोषांचे निर्मूलन व्हावे. राष्ट्र केंद्रीत समाज निर्माण व्हावा. संघ आणि समाज एकरुप व्हावा असे प्रतिपादन हिंदू जागरण मंडळाचे सदस्य सुनिल काळे (Sunil Kale) यांनी केले. राहुरी (Rahuri) येथे धर्म जागरण परिषदेच्या वतीने आयोजित धर्म जागरण सभेत ते बोलत होते .

नक्की वाचा : पोलीस-विद्यार्थी संवादातून सुरक्षिततेचा संदेश; जनजागृती कार्यक्रम उत्साहात

कुटूंब व्यवस्था मोडकळीस आणण्याचे षडयंत्र

सुनील काळे पुढे म्हणाले,वसुधैव कुटूंबकम्  ही भारतीय संस्कृ‌ती आहे. आपली कुटूंब व्यवस्था मोडकळीस आली आहे .अमेरिकेने भारतीय कुटूंब व्यवस्था मोडकळीस आणण्याचे षडयंत्र तयार केले आहे. कुटूंब व्यवस्था आज संकटात आहे. कुटूंब व्यवस्था टिकविण्यासाठी  १०० वर्षापूर्वी डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. हिंदूनी आत्म केंद्रीत स्वभाव बदलून ते राष्ट्र‌प्रेमाने प्रेरित झाले पाहिजेत. हिंदू समाजाकडे एक सज्जनशक्ती आहे. आज सज्जनाची व्याख्या बदलण्याची वेळ  आली आहे. जो राष्ट्रासाठी, धर्मासाठी, जगतो लढतो तोच खरा सज्जन होय. एकतर्फी भाईचारा आपण थांबवला पाहिजे. परकीय आक्रमणाने हिंदूना शेळी बनवले  आहे.आम्ही वाघ आहोत. फक्त आमच्या मधील वाघ जागा होण्याची गरज आहे .

अवश्य वाचा : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच

समाज जागरूक झाला पाहिजे (Hindu Sammelan)

तुकाराम महाराजांचे दहावे वंशज शिवाजी मोरे महाराज म्हणाले,  कुटूंब प्रबोधन,पर्यावरण, स्वबोध, नागरिक कर्तव्य, पाणी या पंचबिंदूवर समाज जागरूक झाला पाहिजे. ही काळाची गरज आहे. भारतीय कुटूंब व्यवस्था टिकविण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये संवाद वाढण्याची गरज आहे संताची शिकवण आचरणात आणून वृक्ष लागवड केली पाहिजे व वृक्ष जगले पाहिजे तर आपले भविष्य उज्ज्वल आहे .संयुक्त कुटूंब व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कुटुंबातील सुसंवाद वाढला पाहिजे. वसुधैव कुटूंबकम् हा ज्ञानेश्वर महाराजांचा विचार आहे. भेदाभेद भ्रम अमंगल आहेत. आजही काही  मंदिरात दलितांना प्रवेश नाही. सामाजिक समरसता वारीत पहायला मिळते. संविधानातील समानता, समरसता प्रत्यक्षात आली पाहिजे. पर्यावरण समस्या गंभीर झाली आहे.  

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

संस्कार व्यवस्था महत्वाची

सुधाकर चतुर्वेदी महाराज म्हणाले, संस्कार व्यवस्था महत्वाची आहे.महाराष्ट्रात शक्ती भक्तीचा संगम आहे.लव्हजिहाद, गोहत्या, धर्मांतरण यात आंशिक सफलता मिळाली आहे. यासाठी कार्यशैली बदलली पाहिजे.राजनितीतून समाज परिवर्तन होत नाही.आत्मकेंद्रित समाजाला राष्ट्रकेंद्रित केले पाहिजे.इस्लामी आक्रमणे समजून घेतली पाहिजेत. आत्मविस्मृत समाजाला जागृत केले पाहिजे. राहुरी तालुका संघचालक अनिल तांबे व्यासपीठावर होते. प्रा.रामकिसन ढोकणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.संजय भडके यांनी सूत्रसंचालन केले. या संमेलनास नागरीकांची मोठी गर्दी होती.