Vikram Pachpute : सुमन काळे मृत्यू प्रकरणाचा फेरतपास व्हावा; आमदार पाचपुते यांची विधानसभेत मागणी

Vikram Pachpute : सुमन काळे मृत्यू प्रकरणाचा फेरतपास व्हावा; आमदार पाचपुते यांची विधानसभेत मागणी

0
Vikram Pachpute : सुमन काळे मृत्यू प्रकरणाचा फेरतपास व्हावा; आमदार पाचपुते यांची विधानसभेत मागणी
Vikram Pachpute : सुमन काळे मृत्यू प्रकरणाचा फेरतपास व्हावा; आमदार पाचपुते यांची विधानसभेत मागणी

Vikram Pachpute : नगर: आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांनी बुधवारी (ता.२५) विधानसभेत लक्षवेधी मांडून राज्य सरकारचे (State Government) लक्ष वेधले. सुमन काळे (Suman Kale) यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात झालेल्या संशयास्पद दिरंगाईबाबत पीडितेच्या नातेवाइकांना व पारधी समाजाला न्याय मिळावा म्हणून या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून गुन्ह्याचा फेरतपास करण्याची मागणी त्यांनी केली.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

अद्याप कारवाई नाही

दरम्यान, त्यावर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने एसआयटी संदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. पारधी समाजाच्या सुमन काळे यांचा २००७ रोजी पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्यात आला. मात्र, कोणतीच ठोस कारवाई होत नाही. १३ जानेवारी २०२१ रोजी उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला सहा महिन्यात खटला संपवावा व पीडित कुटुंबाला पाच लाख रूपये भरपाई देण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, अद्याप कारवाई झाली नाहीये.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सीआयडीच्या तपासातील दिरंगाई संशयास्पद (Vikram Pachpute)

या प्रकरणात सीआयडीच्या तपासातील दिरंगाई आणि संशयास्पद भूमिका यामुळे न्याय मिळणेकामी त्वरित एसआयटी नेमून आरोपींविधात अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदीनुसार कलमात वाढ करून गुन्ह्याचा संपूर्ण फेरतपास करावा अशी, मागणी आमदार पाचपुते यांनी विधानभवनात केली आहे.