Single Mother : सांदिपनी अकॅडमीचा एकल मातांसाठी विशेष उपक्रम – १००% फी माफी

Single Mother : सांदिपनी अकॅडमीचा एकल मातांसाठी विशेष उपक्रम - १००% फी माफी

0
Single Mother : सांदिपनी अकॅडमीचा एकल मातांसाठी विशेष उपक्रम - १००% फी माफी
Single Mother : सांदिपनी अकॅडमीचा एकल मातांसाठी विशेष उपक्रम - १००% फी माफी

Single Mother : नगर : सामाजिक बांधिलकी (Social Responsibility) आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या दृष्टीने सांदिपनी अकॅडमीने (Sandipani Academy) महिला सक्षमीकरण अंतर्गत एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत एकल मातांच्या (Single Mother) (विधवा किंवा घटस्फोटित) मुलांना १००% ट्युशन फी माफी देण्यात येणार आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी लागू

हा उपक्रम विशेषतः त्या मातांसाठी आहे ज्या एकट्याने आपल्या मुलांचे संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत, परंतु आर्थिक अडचणींमुळे दर्जेदार शिक्षण देणे कठीण होत आहे. ही शिष्यवृत्ती इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू असेल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच नव्हे तर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण मिळेल.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

एकल मातांच्या मुलांसाठी खास आधार (Single Mother)

सांदिपनी अकॅडमीने स्पष्ट केले की हा उपक्रम सर्वसाधारण आर्थिक मदत नसून एकल मातांच्या मुलांसाठी खास रचना केलेला आधार आहे. अकॅडमी ही केवळ कोचिंग क्लास नसून येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. शैक्षणिक प्रगतीसोबतच शिस्त, जबाबदारी आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली यांवर विशेष भर दिला जातो.

या उपक्रमाद्वारे सांदिपनी अकॅडमीचे ध्येय आहे की,
Character + Competence + Devotion = Contribution
या तत्त्वावर आधारित विद्यार्थी घडवून समाजाला सक्षम योगदान देणारी पिढी निर्माण करणे.