Ramdas Pujari : रामदास पुजारी व्हिएतनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित

Ramdas Pujari : रामदास पुजारी व्हिएतनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित

0

Ramdas Pujari : पारनेर : कवी, लेखक निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी (Ramdas Pujari) यांना नुकतेच हनोई, व्हिएतनाम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने (Dr. Babasaheb Ambedkar International Literary Award) सन्मानित करण्यात आले. आजवरच्या साहित्य, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाद्वारे व्हिएतनामध्ये (Vietnam) आयोजित सहाव्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

पर्यावरणविषयक जनजागृतीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान

‘आई माझं जग’, ‘उद्याच्या श्वासासाठी’, ‘खोल मनाच्या तळाशी ‘हे काव्यसंग्रह व’ पर्यावरणविषयक घोषवाक्ये ‘ही घोषवाक्य पुस्तिका अशी त्यांची प्रकाशित साहित्यसंपदा आहे. वने, वन्यजीव, पर्यावरणविषयक जनजागृतीमध्ये त्यांनी वेळोवेळी विविध वृत्तपत्रे, मासिके, प्रसारमाध्यमांतून लेख, कविता; घोषवाक्ये, व्याख्याने; आकाशवाणी, दूरदर्शनवरील भाषणे यांच्या माध्यमातून महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक (Ramdas Pujari)

 (ता. २१) मार्च जागतिक वनदिनी झालेल्या या विश्व साहित्य संमेलनात त्यांनी ‘ आंबेडकरवादी विश्व साहित्य व वंचितांचे प्रश्न ‘ या परिसंवादामध्ये सहभागी होऊन त्यांचे विचार मांडले. ‘नेचर फॉर ऑल ‘  आणि ‘ऑल फॉर नेचर’ या विचारांनुसार, उद्याच्या भविष्यासाठी, आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाच्या, पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी ‘ माझी वसुंधरा माझी आई ‘ ही त्यांची कविताही सादर केली. या पुरस्कारासाठी सहकारी, मित्र व समाजाच्या विविध स्तरांमधून पुजारी यांचे अभिनंदन होत आहे.