Illegal Sand Transport : श्रीरामपूर तहसीलदारांचा अवैध वाळूतस्करांना दणका; मातुलठाण येथे ट्रॅक्टर जप्त

Illegal Sand Transport : श्रीरामपूर तहसीलदारांचा अवैध वाळूतस्करांना दणका; मातुलठाण येथे ट्रॅक्टर जप्त

0

Illegal Sand Transport : श्रीरामपूर : तालुक्यातील अवैध धंद्यांविरुद्ध महसूल विभागाने (Revenue Department) आपली आक्रमक मोहीम सुरूच ठेवली आहे. प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या आदेशानुसार, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मातुलठाण येथे गोदावरी नदी (Godavari River) पात्रातून वैध वाळूची वाहतूक (Illegal Sand Transport) करणारा एक ट्रॅक्टर भरारी पथकाने रंगेहाथ पकडला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्येमोठी खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

अनधिकृतरीत्या वाळूची वाहतूक

मिळालेल्या माहितीच्या आधारे, महसूल विभागाच्या पथकाने मौजे मातुलठाण येथील गोदावरी नदी पात्रात सापळा रचला होता. यावेळी एक ट्रॅक्टर अनधिकृतरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला. पथकाने तातडीने छापा टाकत हा ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वाळू माफियांचे धाबे दणाणले (Illegal Sand Transport)

हा ट्रॅक्टर सध्या श्रीरामपूर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला असून सहायक महसूल अधिकारी अशोक नरोड यांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रशांत ओहोळ, ग्राम महसूल अधिकारी प्रदीप चव्हाण, तुषार आगळे, सुरेंद्र पवार, राहुल साठे, गोविंद खैरनार यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.