नगर : लाडक्या बहिणींसाठी आता एक मोठी गुड न्यूज आहे. कारण राज्य सरकार लवकरच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा (Ladki Bahin Yojana) फेब्रुवारीचा हप्ता (February Installment) महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने २७७ कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग (Department of Women and Child Development) करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता २३ फेब्रुवारीला वितरित झाल्यानंतर आता फेब्रुवारीचा हफ्ता नेमका कधी मिळणार याची वाट लाडक्या बहिणी पाहत असताना आता या गुडन्यूजने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नक्की वाचा: धर्मांतर केल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी २७७ कोटींचा निधी मंजूर (Ladki Bahin Yojana)

महायुती सरकारने राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केलेली ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेत देण्यासाठी सरकारने प्रशासकीय हालचाली वेगवान केल्या आहेत. बजेटमधील तरतुदीनुसार २७७ कोटी रुपयांचा निधी वर्ग झाल्यामुळे येत्या काही दिवसांतच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे आणि ज्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण आहे, त्यांना हा लाभ विनाअडथळा मिळणार आहे.
अवश्य वाचा: आयपीएल २०२६ साठी बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, ते कोणते ?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत शेवटची संधी (Ladki Bahin Yojana)
या योजनेचा लाभ कायमचा मिळवण्यासाठी E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक महिलांनी अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना तांत्रिक चुका केल्याचे समोर आले होते. अशा महिलांना आपल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता या मुदतीला फक्त ५ दिवस शिल्लक राहिले आहेत. जर या कालावधीत दुरुस्ती पूर्ण झाली नाही, तर एप्रिल महिन्यापासूनचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशाच पात्र महिलांनी तातडीने आपल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या सेतू केंद्रावरून दुरुस्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी अपडेट नसल्यास केवळ फेब्रुवारीचाच नाही, तर पुढील सर्व हप्ते रखडू शकतात. त्यामुळे ३१ मार्चची वाट न पाहता महिलांनी तातडीने आपले स्टेटस तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



