Nilesh Lanke : आयुष क्षेत्र बळकट करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी

Nilesh Lanke : आयुष क्षेत्र बळकट करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी

0
Nilesh Lanke : आयुष क्षेत्र बळकट करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी
Nilesh Lanke : आयुष क्षेत्र बळकट करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी

Nilesh Lanke : नगर : देशातील आयुष क्षेत्र अधिक सक्षम व व्यापक करण्यासाठी खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आयुष मंत्रालयाच्या (Ministry of AYUSH) सल्लागार समितीच्या बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवत विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले. या बैठकीत आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (Homeopathy) या उपचार पद्धतींचा देशभर विस्तार, तसेच या सेवा ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. खासदार लंके यांनी जनतेच्या अपेक्षा, अडचणी आणि आयुष सेवांतील मर्यादा यांची थेट मांडणी करत आवश्यक सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली.

नक्की वाचा : कर्जत तालुक्यात कोरोनानंतर प्रथमच झळकले इंधन संपल्याचे फलक

विविध योजनांचा आढावा सादर

विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी आयुष सेवांचा अधिक व्यापक वापर, प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता, तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर त्यांनी भर दिला.बैठकीदरम्यान खासदार लंके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी मंत्रालयाच्या विविध योजनांचा आढावा सादर केला. तसेच आयुष क्षेत्राच्या विस्तारासाठी राबविण्यात येणाऱ्या धोरणात्मक उपक्रमांची माहिती दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जनहिताच्या मुद्द्यांवर काम करण्याचा निर्धार (Nilesh Lanke)

आयुष क्षेत्र मजबूत झाल्यास देशाच्या एकूण आरोग्य व्यवस्थेला मोठी ताकद मिळेल. संसदेत आणि समित्यांमध्ये जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न ठामपणे मांडणे ही माझी जबाबदारी आहे. असे खासदार लंके यांनी यावेळी सांगितले.जनतेचा पाठिंबा आणि विश्वासामुळेच त्यांच्या समस्या थेट केंद्रापर्यंत पोहोचवणे शक्य होत असल्याचे नमूद करत, पुढील काळातही जनहिताच्या मुद्द्यांवर सातत्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.