Ram Navami : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात

Ram Navami : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात

0
Ram Navami : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात
Ram Navami : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात

Ram Navami : संगमनेर : संगमनेर शहर (Sangamner City) आणि तालुक्यातील विविध राममंदिरात रामजन्मोत्सव (Ram Navami) विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार अमोल खताळ(Amol Khatal), पत्नी नीलम खताळ, उद्योजक राजेश मालपाणी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, योगराज परदेशी यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची महाआरती करण्यात आली.

नक्की वाचा : धर्मांतर केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मंदिरात आकर्षक सजावट

शहरातील चंद्रशेखर चौकातील राममंदिरामध्ये श्रीराम जयंती उत्सव समितीच्या वतीने मंदिरात सजावट करण्यात आली होती. दुपारी महिला रामभक्तांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने रामजन्माचा पाळणा गात, प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला. या वेळी “जय श्रीराम”च्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता.

अवश्य वाचा : आयपीएल २०२६ साठी बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, ते कोणते?

सर्व राम मंदिरात विद्युत रोषणाई (Ram Navami)

रामजन्मोत्सव समितीच्यावतीने दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांसाठी थंडगार मठ्ठ्याची व्यवस्था करण्यात आली होती. संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक, पंजाबी कॉलनी तसेच नवीन नगर रोडवरील अभिनव नगर येथील राममंदिरांमध्ये उत्सवाची जय्यत तयारी सुरू होती. तसेच सर्व राम मंदिरे रोषणाईने उजळून निघाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

रामभक्तांची मोठ्या संख्येने गर्दी

राम जन्मोत्सव समितीच्या वतीने आमदार खताळ, पत्नी नीलम खताळ, उद्योजक राजेश मालपाणी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, ऋषिकेश मोंढे, राम मंदिर ट्रस्ट विश्वस्त उपासनी बंधू, विजय नागरीचे उपाध्यक्ष विशाल जाखडी, श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, विनय गुणे, गिरीश देशपांडे, श्रीराम गणपुले, वरद बागुल, मुन्ना जोशी, योगेश मंगलकर, राम वामन, विनायक तांबे, विलास परदेशी, योगराज परदेशी, अक्षय थोरात आणि ऋषिकेश मुळे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी शहरातील प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्तांनी गर्दी केली होती.