Bhingar Camp Police Station : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर दगडफेक; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा

Bhingar Camp Police Station : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर दगडफेक; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा

0
Bhingar Camp Police Station : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर दगडफेक; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा
Bhingar Camp Police Station : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर दगडफेक; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा

Bhingar Camp Police Station : नगर : नगर-सोलापूर मार्गावरील (Nagar-Solapur Highway) तुक्कड ओढा परिसरात पोलिसांवर दगडफेक (Stone-pelting) करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १०० हून अधिक जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सुनिल रमेश मालणकर (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. 

अवश्य वाचा : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात

इतर ७० संशयित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

योगेश पंडीत बेरड (वय ३४, रा. वाकोडी ता जि अहिल्यानगर), दीपक कुंडलिक बेरड (वय ४५), देविदास शिवाजी बेरड, राजु पंडित बेरड, मयुर अशोक पुंड (वय ३६) धर्मा दत्तात्रय बेरड (वय ३०),  गणेश प्रकाश शिंदे (रा. दरेवाडी, ता जि अहिल्यानगर), दिपक राजेंद्र बेरड, नेटके मेजर, (पुर्ण नांव माहित नाही), राहुल राधाकिसन करांडे, मयुर भाऊसाहेब बेरड, भानुदास बेरड (पुर्ण नांव माहित नाही).

विशाल अरुण करांडे, बाळासाहेब सुर्यभान करांडे, महादेव छबु करांडे, लहू मारुती करांडे, धनंजय अशोक करांडे, राजेंद्र बेरड (पुर्ण नांव माहित नाही), तुषार मोहन बेरड, सागर हरी बेरड, नितीन शिवाजी बेरड, भाऊसाहेब राजेंद्र बेरड, अनिल शंकर करांडे, संदीप शिवाजी करांडे, बापु करांडे, दिपक भाऊसाहेब करांडे, भाऊसाहेब करांडे, मोहन श्रीधर बेरड,  सचिन अशोक बेरड, गणेश करांडे, कमलेश करांडे, सर्व (रा. दरेवाडी, ता. जि. अहिल्यानगर) व इतर ७० संशयित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शिवीगाळ करत दगडफेक (Bhingar Camp Police Station)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोठ्या संख्येने एकत्र येत रस्त्यावर दुचाकी आडवी लावून पोलिसांच्या वाहनांना अडवले.
दरम्यान, पोलीस कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपींनी त्यांच्याशी धक्काबुक्की, शिवीगाळ करत दगडफेक केली. या घटनेत सुनिल रमेश मालणकर, सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, अंमलदार अमोल पोपट कोतकर, भाऊसाहेब राजु काळे, बाळासाहेब सुभाष खेडकर, मनोज मोहन साखरे, भगवान दुर्योधन धुळे, (सर्व नेमनुक स्थानिक गुन्हे शाखा) हे पोलिस कर्मचारी जखमी झाले असून शासकीय वाहनाचेही नुकसान झाले आहे.या प्रकरणात योगेश पंडीत बेरड याच्यासह अनेक जणांची नावे समोर आली असून, आणखी सुमारे ७० ते १०० अज्ञात व्यक्तींचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.