Attempt To Break ATM : निघोज येथील एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारास अटक

Attempt To Break ATM : निघोज येथील एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारास अटक

0
Attempt To Break ATM : निघोज येथील एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारास अटक
Attempt To Break ATM : निघोज येथील एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारास अटक

Attempt To Break ATM : पारनेर : निघोज (ता. पारनेर) येथील एटीएम फोडून (Attempt To Break ATM) चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगाराला जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना (Parner Police) यश आले आहे. संदीप भजन सिंग (वय २२, मूळ रा. पंजाब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून राज्यातील अन्य एटीएम चोरीचे गुन्हे (Theft Cases) उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा

रोकड लंपास करण्याचा प्रयत्न

२२ मार्च पहाटेच्या सुमारास निघोज येथील एटीएममध्ये एका अज्ञात इसमाने चेहरा झाकून प्रवेश केला होता. त्याने लोखंडी हत्यारांच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संकेत चंद्रशेखर वैद्य (वय ४०, रा. नाशिक) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गुन्हा केल्याचे निष्पन्न (Attempt To Break ATM)

तपासादरम्यान, संशयित आरोपी संदीप भजन सिंग (मूळ रा. फतेहगड, जि. फिरोजपूर, पंजाब; सध्या रा. निघोज) यानेच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून त्याला शिरूर येथून ताब्यात घेतले.हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस पथकातील शिवाजी कडूस, अमोल धामणे, कल्याण लगड, गणेश डोंगरे, सागर वाघ, विजय जाधव, सागर साबळे आणि प्रकाश बोबडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीकडून जिल्ह्यातील आणि राज्यातील इतरही काही एटीएम चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.