Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर मनपाचे गदारोळात बजेट मंजूर; माळीवाडा वेस प्रकरणावरून सभागृहात खळबळ

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर मनपाचे गदारोळात बजेट मंजूर; माळीवाडा वेस प्रकरणावरून सभागृहात खळबळ

0
Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर मनपाचे गदारोळात बजेट मंजूर; माळीवाडा वेस प्रकरणावरून सभागृहात खळबळ
Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर मनपाचे गदारोळात बजेट मंजूर; माळीवाडा वेस प्रकरणावरून सभागृहात खळबळ

Ahilyanagar Municipal Corporation : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेचे (Ahilyanagar Municipal Corporation) आर्थिक वर्षाचे बजेट गदारोळाच्या वातावरणात अखेर मंजूर करण्यात आले. महासभेत विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांमध्ये जोरदार चर्चा झाली. विशेषतः माळीवाडा वेस पाडण्याच्या मुद्द्यावर भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला, तर शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय कावरे व माजी महापौर सुरेखा कदम यांनी या भूमिकेला विरोध दर्शविला.नगरसेवक संपत बारस्कर यांनी “सदर वेस तात्काळ पाडावी, त्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. महापालिकेने कारवाई केली नाही तर आम्हीच ती वेस पाडू,” असा इशारा देत प्रशासनाला थेट आव्हान दिले.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा

ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांना तात्काळ नियुक्ती द्या

कुमार वाकळे यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या का होत नाहीत, असा सवाल उपस्थित केला. “ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांना तात्काळ नियुक्ती द्या,” अशी मागणी त्यांनी केली.ब्लड बँक बंद असल्याच्या मुद्द्यावर विकास जगताप यांनी प्रशासनाला धारेवर धरले. “दरमहा सहा लाख खर्च करूनही किती कॅम्प घेतले?” असा प्रश्न त्यांनी विचारला.डॉ. शंकर शेडाळे यांनी तीन महिन्यांपासून कर्मचारी नसल्याचे सांगितले.“महापालिकेला चालवता येत नसेल तर एखाद्या संस्थेला चालवायला द्या,” अशी आक्रमक भूमिका विकास जगताप यांनी घेतली.यावर गणेश भोसले यांनी “ब्लड बँक नवीन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा,” असा पर्याय सुचविला.अविनाश घुले यांनी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली.संपत बारस्कर यांनी प्रभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर प्रश्न उपस्थित करत “काम करणारे कर्मचारी हटवून काम न करणारे दिले,” असा आरोप केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

निधी रोख स्वरूपात खर्च करा (Ahilyanagar Municipal Corporation)

आयुक्त यशवंत डांगे यांनी “नियोजनासाठी फेररचना केली,” असे स्पष्टीकरण दिले.मयूर बांगरे यांनी मागासवर्गीय कल्याण निधीबाबत प्रश्न उपस्थित करत “८.४१ कोटींचा निधी रोख स्वरूपात खर्च करा,” अशी मागणी केली.ब्लू लाईनमधील बांधकाम परवानग्यांवरून सभागृहात जोरदार चर्चा झाली.“परवानगी देता येत नसेल तर लेआउट मंजूर का केले?” असा सवाल विकास जगताप यांनी उपस्थित केला.संपत बारस्कर यांनी याला “नागरिकांची फसवणूक” असे संबोधत संबंधित प्लॉट महापालिकेने विकत घ्यावेत, अशी मागणी केली.स्नेहल यादव यांनी “चुकीच्या मंजुरीबाबत शासनाला कळवू,” असे सांगितले.

उपाययोजना करण्याची मागणी

निखिल वारे यांनी गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदाईच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरत “नवीन रस्ते फोडू देणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतली. गणेश भोसले यांनीही याला पाठिंबा दिला. बाबा वाकळे यांनी “परवानगी नसताना कनेक्शन कसे दिले?” असा सवाल केला.आयुक्तांनी विविध प्रभागांमध्ये परवानगी मागितल्याचे स्पष्ट केले. अविनाश घुले व रवींद्र बारस्कर यांनी मालमत्ता नोंदणीच्या समस्येकडे लक्ष वेधत उपाययोजना करण्याची मागणी केली. 

नवीन टाक्या उभारण्याची गरज

दिपाली बारस्कर, वर्षा सानप व सुनीता भिंगारदिवे यांनी शहरात महिला स्वच्छतागृहांची उभारणी करण्याची मागणी केली. अमोल येवले यांनी केडगाव परिसरातील पाणीटंचाई मांडत नवीन टाक्या उभारण्याची गरज व्यक्त केली. पे अँड पार्क योजनेवरूनही चर्चा रंगली. कुमार वाकळे यांनी “ठेकेदारांचे कर्मचारी नागरिकांशी गैरवर्तन करतात,” असा आरोप केला. दंडाचे दर पुनरावलोकन करण्याची मागणी विकास जगताप यांनी केली.संपत बारस्कर यांनी सावेडी उपनगरात महापालिकेचे रुग्णालय उभारण्याची मागणी केली.“रुग्णांना ॲडमिट करून उपचाराची सुविधा द्यावी,” असे त्यांनी सांगितले.माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेच्या शाळांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करत डिजिटलायझेशनसाठी निधी वाढवण्याची मागणी केली.