Madhi : पाथर्डी : होळी ते गुढीपाडवा या पंधरा दिवसांच्या यात्रा कालावधीत मढी (Madhi) येथील श्री कानिफनाथांच्या संजीवन समाधी (Shri Kanifnath’s Sanjeevan Samadhi) दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. या काळात नाथांच्या झोळीत भाविकांनी भरभरून दान अर्पण केले असून, रोख सुमारे ९२ लाख रुपये व अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने मिळून एकूण ९५ लाख रुपयांची देणगी (Donation) देवस्थानला प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा देवस्थानच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून वार्षिक उलाढाल सव्वापाच कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यात्रेदरम्यान भाविकांची संख्या सुमारे २५ टक्क्यांनी वाढल्याचेही स्पष्ट झाले आहे. नाथभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मढीमध्ये दररोज भक्तांचा ओघ कायम राहिला.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
सात दिवस मुक्तद्वार दर्शन
यंदा प्रथमच संजीवन समाधीचे मुक्तद्वार दर्शन सात दिवसांसाठी ठेवण्यात आले होते. मागील वर्षी हा कालावधी केवळ चार दिवसांचा होता. या निर्णयामुळे अधिकाधिक भाविकांना थेट दर्शनाचा लाभ मिळाला. तसेच ऑनलाइन देणगी प्रणालीलाही चांगला प्रतिसाद मिळून सुमारे दहा लाख रुपयांची देणगी डिजिटल माध्यमातून जमा झाली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सुयोग्यपणे पार पडले यात्रेचे नियोजन (Madhi)
देवस्थानला यावर्षी नवे विश्वस्त मंडळ मिळाले असून अध्यक्षपदी विठ्ठल मरकड तर सचिवपदी माधुरी मरकड यांची निवड झाली आहे. एकविचारी नेतृत्वामुळे यात्रेचे नियोजन सुयोग्यपणे पार पडल्याचे दिसून आले.दरम्यान, यात्रा काळात तीव्र उष्णतेचा सामना करावा लागूनही भाविकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. दररोज हजारोंच्या संख्येने भक्तांनी नाथांच्या संजीवन समाधीवर डोक टेकवत श्रद्धा व्यक्त केली. यंदाची मढी यात्रा उत्साह, भक्तीभाव आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने विशेष ठरली आहे.



