Fraud : नगर : अहिल्यानगर शहरातील पुणे बसस्थानकावर (Pune Bus Stand) भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका वृद्धाची ७० हजार रूपये किमतीची सात ग्रॅमची सोन्याची अंगठी दोघा चोरट्यांनी हातचलाखीने चोरून नेल्याची घटना घडली समोर आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
२० रू. नोटेमध्ये सोन्याची अंगठी ठेवण्यास सांगितले
अरूण सहादु निंबाळकर (७४, रा. लेखानगर, एकविरा चौक, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी निंबाळकर जाण्यासाठी पुणे बसस्थानकावर पाथर्डी बसची वाट पाहत उभा होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने दुसऱ्याचे भविष्य सांगण्याचे नाटक केले. काही वेळाने ते दोघे निंबाळकर यांच्या जवळ आले. त्यांनी निंबाळकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या दोघांनी निंबाळकर यांना २० रूपयांच्या नोटेमध्ये सोन्याची अंगठी ठेवण्यास सांगितले. अंगठीवर फुंकर मारून ती पिशवीत ठेवल्याचा बहाणा केला. काही वेळाने तपासले असता पिशवीत अंगठी व नोट दोन्ही मिळून आले नाही.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दोघांनी मिळून केली फसवणूक (Fraud)
फिर्यादीनुसार, ३५ वर्षे वयाचा एक आणि २५ ते ३० वर्षे वयाचा दुसरा संशयित आरोपी अशा दोघांनी मिळून ही फसवणूक केली आहे. चोरीला गेलेली अंगठी ७ ग्रॅम वजनाची असून त्यात पिवळ्या रंगाचा पुष्कराज खडा होता. निंबाळकर यांनी आपल्या मुलाला माहिती दिली. मुलगा घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.



