Suicide | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात रविवारी (ता.२९) रोजी एकाच दिवशी चार पुरुष आणि एक महिला अशा पाच जणांनी गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही घटना नगर, पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर तालुक्यात घडल्या आहेत. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून पोलिसांकडून या आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
हे वाचा – श्रीगोंद्यात ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा
गळफास घेत आत्महत्या (Suicide)
नगर एमआयडीसी परिसरातील चेतना कॉलनी येथे २६ वर्षीय महिलेने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना २९ मार्च रोजी सायंकाळी उघडकीस आली. ऋतुजा खुटवड (रा. चेतना कॉलनी, अहिल्यानगर, मूळ रा. प्रभु पिंप्री, ता. पाथर्डी) असे मयत महिलेचे नाव आहे. ऋतुजा यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्या चुलत्यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय चव्हाण यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या अहवालावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अवश्य वाचा – श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
उपचारापूर्वीच मयत घोषित (Suicide)
पारनेर तालुक्यात राळेगण सिद्धी आणि करंदी गावात दोघांनी २९ मार्च रोजी एकाच दिवशी गळफास घेत आत्महत्या केली आहे. राळेगण सिद्धी येथे विठ्ठल बांगर (वय ४५, रा. राळेगण सिद्धी, ता. पारनेर) यांनी गळफास घेतल्याची घटना सकाळी ८ च्या सुमारास निदर्शनास आली. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या अहवालावरून पारनेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आकस्मात मृत्यूची नोंद (Suicide)
दुसरी घटना करंदी गावात रात्री ७.५२ च्या सुमारास उघडकीस आली. येथील आशिष उघडे (वय ३६, रा. करंदी, ता. पारनेर) यांनी गावच्या शिवारात गळफास घेतला. ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांना त्यांचे बंधू मयूर उघडे यांनी उपचारासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या अहवालावरून पारनेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे किरण खेमनर (वय २८, रा. ओझर बुद्रुक, ता. संगमनेर) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सकाळी ८ च्या सुमारास निदर्शनास आली. मयत किरण यांच्या मृतदेहाचे घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पहा – द कम्प्लिट मॅन… ‘रेमंड सम्राट’ विजयपत सिंघानियांची एक्झिट!
श्रीरामपूर शहरात चैतन्य अमोलिक (वय १८, रा. सरस्वती कॉलनी, वार्ड क्र. ७) याने राहते घरी गळफास घेतल्याची घटना सांयकाळी ७.३० च्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या मृतदेहाचे साखर कामगार हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



