Case Registered : पाथर्डी : शहरातील हॉटेल मध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून सहाजणांनी मिळून एका तरुणावर जीवघेणा हल्ला (Life-Threatening Attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. त्याच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरसाटवाडी येथील नारायण मारुती शेकडे (वय ३८) २७ मार्च सकाळच्या सुमारास पाथर्डी येथील एका हॉटेल समोर आले होते. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या अंकुश रामा शिरसाठ यांना थोडे बाजूला होण्यास सांगितल्याचा राग मनात धरून अंकुश शिरसाठ यांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
धारदार शस्त्राने डोक्यावर वार (Case Registered)
यानंतर काही वेळातच अंकुश शिरसाठ यांनी त्यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले. मंगेश अंकुश शिरसाठ, आदित्य अंकुश शिरसाठ, बाळासाहेब रामा शिरसाठ, लक्ष्मण रावसाहेब शिरसाठ आणि संदीप रावसाहेब शिरसाठ यांनी एकत्र येत नारायण शेकडे यांच्यावर हल्ला चढवला. या वेळी मंगेश शिरसाठ याने धारदार शस्त्राने डोक्यावर वार केला, तर आदित्य शिरसाठ याने लोखंडी गजाने हातावर प्रहार केला. इतर आरोपींनी लाकडी दांडके तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यादरम्यान ठार मारून टाकण्याची धमकी देत शिवीगाळही करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
साहित्याचे मोठे नुकसान
या घटनेत हॉटेल मधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. मारहाणीत शेकडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळासाहेब रामा शिरसाठ याला अटक करण्यात आली आहे. पाथर्डी न्यायालयाने त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी करीत असून पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बडे हे त्यांना सहाय्य करीत आहेत.



