Bhingar Camp Police Station : भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ; चौकशीची मागणी

Bhingar Camp Police Station : भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ; चौकशीची मागणी

0
Bhingar Camp Police Station : भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ; चौकशीची मागणी
Bhingar Camp Police Station : भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ; चौकशीची मागणी

Bhingar Camp Police Station : नगर : भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) कार्यरत असलेल्या एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याला वरिष्ठांकडून शिवीगाळ व मानसिक छळ (Mental Harassment) झाल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत संबंधित कर्मचाऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी

२०११ पासून पोलीस खात्यात कार्यरत

पोलीस कॉन्स्टेबल वैभव मच्छिंद्र झिने यांनी दिलेल्या अर्जानुसार, ते सन २०११ पासून पोलीस खात्यात कार्यरत असून सध्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संगणकाचे काम पाहत आहेत. २९ मार्चला ड्युटीवर असताना मारहाणीच्या तक्रारीसाठी आलेल्या जमावासंदर्भात वैद्यकीय मेमो तयार करण्याचे काम त्यांनी केले. मात्र प्रिंटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रिंट निघाली नाही.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अर्वाच्य भाषेत शिवीगाळ (Bhingar Camp Police Station)

यावेळी ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार पठारे यांनी जमावासमोरच झिने यांच्यावर आईविषयी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे आपली मानसिक अवस्था खालावल्याचे झिने यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, कोणतीही चूक नसताना अपमानास्पद वर्तन करून सेवा नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करून शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.