Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील गोदरेज (Godrej) कंपनीत दोन लाख ७७ हजार ३११ रुपयांची अफरातफर करणारे दोघे संशयित आरोपी स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने पाथर्डी तालुक्यातून जेरबंद केले. अंबादास शंकर दराडे (वय- २८, रा. सांगवी खुर्द, पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर), देविदास तुकाराम साबळे (वय- २६, रा.. शेकटे, मारुती मंदिराच्यामागे ता. पाथर्डी) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे (Suspect) नाव आहे.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
लबाडीच इराद्याने मालाची अफरातफर
वडगाव गुप्ता येथील असलेल्या गोदरेज कंपनीच्या गोडाऊनमधून गोदरेज कंपनीचे व्हॅन सेल्स रिप्रेझेन्टेटिव्ह अंबादास शंकर दराडे रा. सांगवी खुर्द पागोरी पिंपळगांव ता.पाथर्डी व वाहन चालक देविदास तुकाराम साबळे रा. पाथर्डी यांनी त्यांचे ताब्यातील वाहनामधुन गोदरेज कंपनीचे वेळोवेळी घेवुन गेलेल्या मालापैकी दोन लाख ७७ हजार ३११ रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीतांना स्वतःचे आर्थिक फायाद्याकरिता लबाडीचे इराद्याने मालाची अफरातफर करुन परस्पर विल्हेवाट लावाली असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून पाथर्डी तालुक्यातील दोघे संशयित ताब्यात घेतले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार, सुरेश माळी, विष्णु भागवत, फुरकान शेख, सागर ससाणे महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे यांच्या पथकाने केली आहे.



