Case Registered : पाथर्डी : तालुक्यातील भुतेटाकळी येथे कौटुंबिक वादातून भाच्याने मामाला काठीने मारहाण (Assault) केल्याची घटना घडली आहे. या घटनेत मामाच्या डोक्याला दुखापत (Head Injury) झाली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Case Registered) करण्यात आली आहे.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
जुन्या कारणावरून दोघांमध्ये वाद
मारूती भागीनाथ फुंदे (वय ३८, सध्या रा. उल्हासनगर) हे आपल्या कुटुंबासह गावातील यात्रेनिमित्त भुतेटाकळी येथे आले होते. ३० मार्च दुपारच्या सुमारास ते आपल्या घरासमोर झोपलेले असताना त्यांचा भाचा गणेश रामदास बडे (रा. काटेवाडी, ता. पाथर्डी) हा तेथे आला. यावेळी जुन्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते. या वादातून संतापलेल्या भाच्याने हातातील लाकडी काठीने फुंदे यांच्या डोक्यावर प्रहार केला. तसेच शिवीगाळ करत “तुला पाहून घेतो” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात धाव (Case Registered)
घटनेनंतर फुंदे यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील बापू नवनाथ फुंदे व संजय निवृत्ती फुंदे हे घटनास्थळी धावून आले. त्यांना पाहून गणेश तेथून पळून गेला. जखमी अवस्थेत फुंदे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठविले असून उपचारानंतर त्यांनी लेखी तक्रार दिली आहे. या प्रकरणी संबंधित भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



