Suicide : विवाहितेची आत्महत्या; सासू-सासऱ्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Suicide : विवाहितेची आत्महत्या; सासू-सासऱ्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

0
Suicide : विवाहितेची आत्महत्या; सासू-सासऱ्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
Suicide : विवाहितेची आत्महत्या; सासू-सासऱ्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Suicide : नगर : एमआयडीसी परिसरात (MIDC Area) राहत असलेल्या एका विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋतुजा अर्जुन खुटवड असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, विवाहितेला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सासू सासऱ्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी

गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी

सासरे प्रकाश एकनाथ राजळे व सासू भारती प्रकाश राजळे (दोघे रा. तिसगाव, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत. यासंदर्भात मयत ऋतुजा खुटवड यांच्या आई नंदा अर्जुन खुटवड (वय ५० रा. प्रभुपिंपरी, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा खुटवड या सध्या एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत राहत होत्या. २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मानसिक छळ केल्याचा आरोप (Suicide)

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संशयित आरोपी यांनी ऋतुजावर बाळासाठी दबाव टाकणे, तसेच तिच्यावर वारंवार प्रश्नांचा भडीमार करून मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून ऋतुजाने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.