Murder : ऊस तोडीच्या पैशावरून वाद; कुऱ्हाडीने बहिणीचा खून, एक जखमी

Murder : ऊस तोडीच्या पैशावरून वाद; कुऱ्हाडीने बहिणीचा खून, एक जखमी

0
Murder : ऊस तोडीच्या पैशावरून वाद; कुऱ्हाडीने बहिणीचा खून, एक जखमी
Murder : ऊस तोडीच्या पैशावरून वाद; कुऱ्हाडीने बहिणीचा खून, एक जखमी

Murder : नगर : शेवगाव तालुक्यातील एरंडगाव समसूद येथे ऊस तोडीच्या (Sugarcane Harvesting Laborers) पैशाच्या वादातून एका महिलेचा कुऱ्हाडीने खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ३१) घडली. या घटनेत फिर्यादी महिला जखमी (Injured) झाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

दिलेल्या पैशांची मागणी केल्यावरून वाद

याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भारती किशोर वैष्णव (वय ४३, रा. गांधीचमन, ता. जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या व त्यांची बहीण मीरचना अशपाक काळे (रा. धामणगाव, ता. पाथर्डी) या आरोपी जयराम शंकर भोसले (रा. एरंडगाव समसूद, ता. शेवगाव) यांच्या घरी गेल्या होत्या. ऊस तोडीसाठी दिलेल्या पैशांची मागणी केल्यावरून घरात वाद सुरू झाला. वाद वाढताच आरोपी जयराम भोसले यांनी संतापाच्या भरात घरातून लोखंडी कुऱ्हाड आणून “जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत मीरचना काळे यांच्या डाव्या गालावर व कानाजवळ जोरदार वार केला. या हल्ल्यात त्या जागीच ठार झाल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल (Murder)

दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या फिर्यादी भारती वैष्णव यांच्यावरही आरोपीने कुन्हाडीने वार करून त्यांना जखमी केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक मुटकुळे तसेच इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी फॉरेन्सिक पथकानेही पाहणी केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अटक प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी लहाने करीत आहेत.