Uttareshwar Temple : ६० वर्षानंतर उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवात तमाशा कलाकारांची हजेरी

Uttareshwar Temple : ६० वर्षानंतर उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवात तमाशा कलाकारांची हजेरी

0
Uttareshwar Temple : ६० वर्षानंतर उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवात तमाशा कलाकारांची हजेरी
Uttareshwar Temple : ६० वर्षानंतर उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवात तमाशा कलाकारांची हजेरी

Uttareshwar Temple : पाथर्डी : तालुक्यातील करंजी येथील ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानचा यात्रा (Uttareshwar Temple Fair) उत्सव ३० मार्च ते ३१ मार्च असा दोन दिवस मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये झाला. सोमवारी (ता. ३०) दुपारी बारा वाजता हेलिकॉप्टरद्वारे (Helicopter) श्रीराम मंदिर, ग्रामदैवत उत्तरेश्वर मंदिर, हनुमान मंदिरावर पुष्पृष्टी करण्यात आली. त्यानंतर दिवसभर इतर अनेक धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी छबीना मिरवणूक (Chhabina Procession) झाली त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्वर्गीय विठाबाई मांग लोकनाट्य तमाशा झाला. 

नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

करंजी ग्रामस्थांची मोठी गर्दी

दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ३१) तमाशा कलावंतांच्या मारुती मंदिराच्या पाठीमागे हजऱ्या झाल्या साठ वर्षांपूर्वी हिरामण बडे, हरिभाऊ बडे यांच्या आई-वडिलांच्या तमाशातील कलाकारांनी करंजीत रात्रीचा तमाशा आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या हाजऱ्या दिल्या होत्या. या घटनेला आज साठ वर्षे झाली आहेत. त्यामुळे साठ वर्षानंतर तमाशा कलावंतांच्या हजऱ्या करंजी गावात होणार असल्याने या कलाकारांची दिवसाची कला अदाकारी पाहण्यासाठी देखील करंजी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यात्रा कमिटीच्या वतीने नारायणगावकर यांचा सन्मान (Uttareshwar Temple)

रोहित नारायणगावकर, कैलास नारायणगावकर, मोहित नारायणगावकर यांच्या तमाशा कलाकारांनी हजऱ्यातून आपल्या कलागुणांना वाव देत यात्रा कमिटीकडून पुढच्या वर्षीचे देखील आमंत्रण स्वीकारले. यावेळी नामांकित तमाशा कलावंत हिरामण बडे व रोहित नारायणगावकर यांचा यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला. करंजी येथील नामांकित बासरी वादक स्वर्गीय ईसाक पठाण यांचे चिरंजीव आयुब पठाण, सोहेल पठाण यांनी देखील बँड व बासरी वादणातुन करंजीकरांची मने जिंकली. ईसाक पठाण यांची तिसरी पिढी आता या कलाक्षेत्रात उतरली आहे म्हणून त्यांचा देखील यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

यात्रेकरूंमद्ये उत्सुकता वाढली

इतरही हजऱ्यांच्या निमित्ताने वेगवेगळी कला सादर करणाऱ्या कलावंतांचा देखील यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार केला. एकंदरीत यात्रा कमिटीकडून आयोजित करण्यात आलेल्या हेलिकॉप्टरने पुष्पृष्टी व लोकनाट्य तमाशा कलाकारांच्या हजऱ्या या सर्व कार्यक्रमामुळे करंजीचा यात्रा उत्सव संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला. पुढच्या वर्षी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम यात्रेच्या निमित्ताने निश्चितपणे आयोजित करणार असल्याचे सरपंच रफिक शेख यांनी यावेळी जाहीर केल्याने यात्रेकरूंची देखील भलतीच उत्सुकता वाढली.