Load Shedding : पारनेर : पारनेर तालुक्यातील मुंगशी (Mungshi) गावात दररोज रात्री ६ ते १० या वेळेत होणाऱ्या भारनियमनामुळे (Load Shedding) ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांचे परीक्षा काळात मोठे नुकसान होत असल्याने तसेच परिसरात बिबट्याच्या (Leopard) हालचालीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
पाठपुराव्याला यश
या पार्श्वभूमीवर प्रवीण करपे यांनी संबंधित विभागाकडे ठाम मागणी करत भारनियमन तत्काळ बंद करण्याची भूमिका घेतली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. सहाय्यक अभियंता पिसाळ यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ लाईट सुरू करण्याचे निर्देश दिले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
भारनियमन बंद करण्यात आले (Load Shedding)
त्यामुळे रात्री ६ ते १० या वेळेत होणारी भारनियमन बंद करण्यात आले आहे. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे पाटील व दत्ता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला .



