Madhava Mathematics Competition : पारनेरमध्ये ‘माधवा मॅथेमॅटिक्स कॉम्पिटिशन’ उत्साहात; विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

Madhava Mathematics Competition : पारनेरमध्ये ‘माधवा मॅथेमॅटिक्स कॉम्पिटिशन’ उत्साहात; विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

0
Madhava Mathematics Competition : पारनेरमध्ये ‘माधवा मॅथेमॅटिक्स कॉम्पिटिशन’ उत्साहात; विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग
Madhava Mathematics Competition : पारनेरमध्ये ‘माधवा मॅथेमॅटिक्स कॉम्पिटिशन’ उत्साहात; विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

Madhava Mathematics Competition : पारनेर : भास्कराचार्य प्रतिष्ठान (Bhaskaracharya Pratishthan), पुणे व नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर येथील ‘न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज’मध्ये (New Arts, Commerce and Science College) नुकतीच ‘माधवा मॅथेमॅटिक्स कॉम्पिटिशन’ (Madhava Mathematics Competition) उत्साहात आणि यशस्वीरीत्या झाली. महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणितासारख्या आव्हानात्मक विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर करून गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

अटीतटीच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

या स्पर्धेत गणित आणि संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या अटीतटीच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये कोरडे साक्षी बाळासाहेब (तृतीय वर्ष, गणित) – प्रथम क्रमांक, महांडूळे वैष्णवी शिवाजी (प्रथम वर्ष, गणित) – प्रथम वर्ष गटात प्रथम क्रमांक, बेलोटे ईश्वरी संतोष (प्रथम वर्ष, संगणकशास्त्र) – प्रथम वर्ष गटात द्वितीय क्रमांक सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर आणि गणित विभाग प्रमुख प्रा. आर. डी. सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद (Madhava Mathematics Competition)

 याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, गणितासारख्या कठीण वाटणाऱ्या विषयाची विद्यार्थ्यांच्या मनावरील भीती दूर करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत आवश्यक असते. माधवा मॅथेमॅटिक्स कॉम्पिटिशनसारख्या दर्जेदार उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची केवळ तार्किक विचारशक्तीच नव्हे, तर विश्लेषणात्मक क्षमताही  विकसित होते. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत दाखवलेला उत्साह आणि मिळवलेले यश खरोखरच अभिमानास्पद आहे. स्पर्धात्मक वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होत असून, गणित हा विषय आता केवळ पुस्तकापुरता मर्यादित न राहता त्यांच्या दैनंदिन विचारप्रक्रियेचा भाग बनत आहे. या यशस्वी आयोजनाबद्दल मी गणित विभाग आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.या स्पर्धेच्या आयोजनामध्ये स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अनिल भांगरे, प्रा. प्रितेश बांगर आणि प्रा. प्राजक्ता मंदिलकर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.