Suicide : सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने संपवली जीवनयात्रा; गुन्हा दाखल

Suicide : सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने संपवली जीवनयात्रा; गुन्हा दाखल

0
Suicide : सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने संपवली जीवनयात्रा; गुन्हा दाखल
Suicide : सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने संपवली जीवनयात्रा; गुन्हा दाखल

Suicide : कर्जत : सावकाराच्या जाचास कंटाळून वडगाव तनपुरा (ता.कर्जत) येथील एकाने आपली जीवनयात्रा संपवली (Suicide) आहे. संजय पांडुरंग शहाणे असे जीवन संपवलेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत मयताच्या पत्नीच्या फिर्यादीनुसार कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. 

नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

जीवेच मारून टाकण्याची दिली धमकी

या बाबत अधिक माहिती अशी की, मयत संजय शहाणे घरी असताना संशयित आरोपी अशोक राऊत आणि त्यांच्या सोबत इतर तीन जण घरी येत तू आमच्याकडून व्याजाने घेतलेले दीड लाख रुपये आताच्या आता दे. अन्यथा तुला उचलून घेवून जाऊ अशी धमकी देत निघून गेले. सोमवार (ता. ३०) मार्चला पुन्हा घरी येत तुला दिलेली मुदत संपली असून तू आमचे पैसे अजून पण दिले नाही म्हणत तुला जीवेच मारून टाकतो असे म्हणाल्याने संजय हा घराबाहेर पडला. व्याजाच्या पैशाला होणारा जाच आणि सावकाराच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून संजय शहाणे याने वडगाव तनपुरा शिवारातील आंब्याच्या झाडास गळफास घेत जीवन संपवले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तीन संशयित आरोपी पसार (Suicide)

याबाबत मयताची पत्नी अश्विनी संजय शहाणे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अशोक राऊत (भांडेवाडी ता. कर्जत) याला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील उर्वरित तीन संशयित आरोपी पसार असून कर्जत पोलीस विभाग त्यांच्या मागावर आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, प्रभारी पोलीस निरीक्षक विजय झंझाड़ यांनी भेट दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोऱ्हाडे सदर घटनेचा अधिक तपास करीत आहे. कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा अवैध सावकारी त्यांच्या वसुली जाचाचा मुद्दा अधोरेखित झाला आहे.