Hanuman Jayanti : संगमनेमध्ये महिलांनी ओढला हनुमानाचा रथ; हजारो महिलांचा सहभाग

Hanuman Jayanti : संगमनेमध्ये महिलांनी ओढला हनुमानाचा रथ; हजारो महिलांचा सहभाग

0
Hanuman Jayanti : संगमनेमध्ये महिलांनी ओढला हनुमानाचा रथ; हजारो महिलांचा सहभाग
Hanuman Jayanti : संगमनेमध्ये महिलांनी ओढला हनुमानाचा रथ; हजारो महिलांचा सहभाग

Hanuman Jayanti : संगमनेर : “पवनपुत्र हनुमान, प्रभू श्रीरामचंद्र की जय” चा जयघोष करत आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह उपस्थित शेकडो महिलांनी एकत्र येत हनुमानाचा (Hanuman Jayanti) रथ महिलांनी ओढण्याची परंपरा (Tradition) कायम जपली आहे.

अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी

सजवलेल्या रथावर भगवा ध्वज आला लावण्यात

हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सकाळी ८ वाजता संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी भगवा ध्वज घेऊन वाजत-गाजत चंद्रशेखर चौकात आणला आणि सजवलेल्या रथावर विधिवत लावण्यात आला त्यानंतर आमदार अमोल खताळ व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते पवनपुत्र हनुमानरायाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर नीलम खताळ, माजी नगरसेविका शोभा परदेशी, भाजप शहर आध्यक्ष पायल ताजणे, रेखा गलांडे, दुर्गा तांबे, नगराध्यक्षा मैथिली तांबे, जयश्री थोरात यांच्यासह शेकडो महिलांनी रथाचा दोर हातात धरून चंद्रशेखर चौकापर्यंत रथ ओढला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मारुती मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता (Hanuman Jayanti)

चंद्रशेखर चौकातून निघालेली रथाची मिरवणूक, रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, नगर पालिका, चावडी चौक, जुना कटारिया बाजारपेठ, तेलीखुंट, नेहरू चौक या मार्गाने फिरून पुन्हा मोठ्या मारुती मंदिराजवळ या मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणूक शांततेत घडून आणण्यासाठी पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, राजाभाऊ देशपांडे, वरद बागुल, चंद्रशेखर हिंदू मंडळाचे अध्यक्ष शुभम लाहामगे तसेच महिला शक्ती सदस्य देवयानी जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.