Akole News : अकोले : येथील मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या (Abhinav Public School) विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल गणित ऑलिम्पियाड परीक्षेत (International Mathematics Olympiad Examination) उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा मान उंचावला आहे. विद्यार्थ्यांनी एकूण १७ सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवला.
अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी
शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती
या यशामध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत कठीण गणितीय प्रश्नांना समर्थपणे सामोरे जात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण ८७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये १७ विद्यार्थांनी सुवर्णपदक मिळवले तर उर्वरित ७० विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मानांकन व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शिक्षकांचेही विशेष अभिनंदन (Akole News)
या यशामागे विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांसोबत सर्व गणित शिक्षक, पालक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या अल्फोन्सा डी., पर्यवेक्षक पराग सानप, समुपदेशक आरती जाधव, सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.



