Siddhibag Renovation : नगरच्या प्रसिध्द सिद्धीबागेचे रूप पालटणार; महापौर-उपमहापौरांचा पुढाकार

Siddhibag Renovation : नगरच्या प्रसिध्द सिद्धीबागेचे रूप पालटणार; महापौर-उपमहापौरांचा पुढाकार

0
Siddhibag Renovation : नगरच्या प्रसिध्द सिद्धीबागेचे रूप पालटणार; महापौर-उपमहापौरांचा पुढाकार
Siddhibag Renovation : नगरच्या प्रसिध्द सिद्धीबागेचे रूप पालटणार; महापौर-उपमहापौरांचा पुढाकार

Siddhibag Renovation : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) सिद्धी बागेच्या नूतनीकरणासाठी (Siddhibag Renovation) महापौर ज्योती गाडे (Jyoti Gade), उपमहापौर धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) व आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत कन्सल्टंटमार्फत सिद्धीबागेच्या विकास आराखड्याचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी मनपा महिला बालकल्याण समिती उपसभापती वर्षा सानप, नगरसेवक निखील वारे, जितू गंभीर, अभियंता आर. जी. मेहत्रे, गणेश गाडळकर आदी उपस्थित होते. सादरीकरणादरम्यान बागेच्या नूतनीकरणाच्या विविध बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच कन्सल्टंटला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

अवश्य वाचा : राहाता तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान ; विखे यांच्याकडून पाहणी

महापौर ज्योती गाडे यांनी सांगतिले की,

सिद्धीबाग ही नगरची एकेकाळची ओळख होती. ती ओळख पुन्हा जिवंत करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नूतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी डीपीआर मंजुरीच्या अनुषंगाने कन्सल्टंटकडून सादरीकरण करण्यात आले असून त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत.

Siddhibag Renovation : नगरच्या प्रसिध्द सिद्धीबागेचे रूप पालटणार; महापौर-उपमहापौरांचा पुढाकार
Siddhibag Renovation : नगरच्या प्रसिध्द सिद्धीबागेचे रूप पालटणार; महापौर-उपमहापौरांचा पुढाकार

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की, (Siddhibag Renovation)

सिद्धीबागेची पाहणी करून कन्सल्टंट नेमून सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्याचे सादरीकरण महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यांच्या सूचनांनुसार आराखड्यात आवश्यक बदल करून अंतिम आराखडा मंजूर करण्यात येईल. सिद्धी बागेचे रूप पालटून नगरची ओळख अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न आहे.

आयुक्त डांगे यांनी केल्या सूचना
बागेच्या विकासासाठी काही थीम्सची माहिती दिली. नागरिकांसाठी आकर्षक, सुबक व सर्व सुविधा असलेली बाग विकसित करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.