नगर : फक्त एक नंबर डायल केला (Online Fraud) आणि बँक खात्यातून ४० हजार रुपये गायब (Money disappeared from bank account) झालेत! हो असं घडलयं आपल्या अहिल्यानगर (Ahilyanagar)शहरात. आजच्या डिजिटल युगात तुम्ही सुरक्षित आहात असं तुम्हाला वाटलं असलं तरीही आपल्याकडूनच चुका होतात आणि त्याची मोठी नुकसानभरपाई आपल्यालाच करावी लागते. नेमकं काय घडलय तेते सविस्तर पाहू…
नक्की वाचा: आता झेडपी शाळेत प्रवेशावर मिळणार ‘ही’ मोठी सवलत
नेमकं काय घडलं? (Online Fraud)
ऑनलाइन पैसे पाठवणे एकाला चांगलेच महागात पडले. चुकीचा नंबर डायल झाल्यामुळे मित्राला पाठविलेले सहाशे रुपये मध्य प्रदेशातील व्यक्तीच्या खात्यात गेले. ते परत घेण्यासाठी बँकेचा आयएफएससी कोड दिला. त्याआधारे सायबर भामट्याने खात्यातील ३९ हजार ९८९ रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२४ रोजी घडला असून, याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. याबाबत नालेगाव येथे राहणाऱ्या आदित्य संजय बेल्हेकर यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांना त्यांचा मित्र महेश राठोड यांना ६०० रुपये पाठवायचे होते. मात्र त्यांच्याकडून चुकीचा नंबर डायल झाल्याने ही रक्कम हरिलाल नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाली. त्यांनी अॅपवरून नंबर घेऊन त्या व्यक्तीला फोनही केला. मात्र त्याने बँकेचा आयएफएससी कोड मागितला. पैसे परत मिळतील, या आशेने फिर्यादीने आयएफएससी कोड त्याला पाठविला. मात्र त्यांचे ६०० रुपये तर परत आलेच नाहीत. उलट त्यांच्या बँक खात्यातील ३९ हजार ९८९ रुपये गायब झाले. तसा मेसेजही त्यांना आला. पैसे खात्यातून गायब झाल्याने त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.
अवश्य वाचा: अतिवृष्टीत दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत; नेमकी किती ?
“मित्रांनो, तंत्रज्ञान जितकं सोपं आहे, तितकंच ते धोक्याचंही ठरू शकतं. तुमची एक छोटीशी घाई तुमच्या कष्टाची कमाई हिरावून घेऊ शकते. त्यामुळे कोणताही नंबर डायल करताना किंवा पैसे ट्रान्सफर करताना दहा वेळा खात्री करा.



