Cancer Patient : कर्करोग रुग्णांसाठी ठोस उपाययोजना करा; खासदार नीलेश लंके यांची लोकसभेत मागणी

Cancer Patient : कर्करोग रुग्णांसाठी ठोस उपाययोजना करा; खासदार नीलेश लंके यांची लोकसभेत मागणी

0
Cancer Patient : कर्करोग रुग्णांसाठी ठोस उपाययोजना करा; खासदार नीलेश लंके यांची लोकसभेत मागणी
Cancer Patient : कर्करोग रुग्णांसाठी ठोस उपाययोजना करा; खासदार नीलेश लंके यांची लोकसभेत मागणी

आयुष्यमान भारत योजनेची मर्यादा वाढवून स्वतंत्र कर्करोग सहायता निधी उभारण्याचा आग्रह

Cancer Patient : नगर : खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी लोकसभेमध्ये कर्करोग रुग्णांच्या (Cancer Patient) गंभीर समस्यांकडे केंद्र सरकारचे (Central Government) लक्ष वेधले. ग्रामीण भागातील रुग्णांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली.

अवश्य वाचा: विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंकडून जे नाव येईल त्याला आम्ही सहकार्य करु – शरद पवार

केमोथेरपीसाठी वारंवार मुंबई आणि पुणे येथे चकरा

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहिल्यानगर जिल्ह्याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, येथील गरीब कर्करोग रुग्णांना केमोथेरपीसाठी वारंवार मुंबई आणि पुणे येथील रुग्णालयांमध्ये जावे लागते. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आर्थिक व मानसिक ताण येत आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना कर्करोगाच्या उपचारासाठी शेतजमीन, दागदागिने व मालमत्ता विकावी लागत असल्याचे वास्तव त्यांनी संसदेत मांडले. “ही परिस्थिती केवळ आरोग्य व्यवस्थेचे अपयश नसून सरकारच्या संवेदनशीलतेची कसोटी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रत्येक तालुक्यात उपकेंद्र सुरू करण्याची मागणी (Cancer Patient)

सरकारने प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर कॅन्सर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली असली, तरी ती प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील मुख्य कर्करोग उपचार केंद्राचा विस्तार करून प्रत्येक तालुक्यात उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणारी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत कर्करोगासारख्या गंभीर आजारासाठी अपुरी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर कर्करोग रुग्णांसाठी स्वतंत्र ‘कर्करोग सहायता निधी’ निर्माण करावा आणि आर्थिक मदतीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.

“गरीब रुग्णांचा जीव घोषणांवर नव्हे, तर वेळेवर आणि परवडणाऱ्या उपचारांवर वाचतो. त्यामुळे सरकारने तातडीने ठोस निर्णय घेऊन ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांना दिलासा द्यावा,” असे आवाहन खासदार लंके यांनी केले.