Rahuri Assembly Constituency: राहुरी : विधानसभा (Rahuri Assembly Constituency) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल (Nomination Filed) करण्याच्या अखेरच्या (ता. ६) दिवसांपर्यंत ४२ अर्ज दाखल झाले. तीन पक्षाचे तीन उमेदवार वगळता अन्य अपक्ष उमेदवार आहेत. आज (ता.६) अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी तहसील कार्यालयात महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला.
अवश्य वाचा: मोबाईल व घरातील दागिने घेऊन नवरी पसार; पाथर्डी तालुक्यातील घटना
शेवटच्या क्षणी तनपुरे यांची माघार
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण ,जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते ,आमदार मोनिकाताई राजळे यावेळी उपस्थित होते. शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गोविंद मोकाटे यांचा अर्ज दाखल झाला आहे. या पक्षाने माजी मंत्री व माजी आमदार प्राजक्त तनपुरे व गोविंद मोकाटे यांच्या नावाचे दोन एबी फॉर्म पाठवलेले होते. मात्र, शेवटच्या क्षणी झालेल्या निर्णायक घडामोडींनी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज दाखल केला नाही.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मोकाटे यांचा अर्ज दाखल (Rahuri Assembly Constituency)
या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून गोविंद मोकाटे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातर्फे अर्ज दाखल केला. बहुजन वंचित आघाडीच्या वतीने संतोष चोळके यांनी अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेचे उबाठाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. शिवसेनेचा उबाठा गटाचा एबी फॉर्म त्यांना मिळू शकला नाही तर शेतकरी नेते रवींद्र मोरे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला. एकुण २७ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
मुख्यमंत्र्यांची इच्छा आणि विरोधकांची पाठ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीमध्ये येऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन विरोधी पक्षांना केले होते. मात्र, विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यातील किती उमेदवारी अर्ज रिंगणात राहतात यावर निवडणूक ठरणार आहे.
गोविंद मोकाटे – अपक्ष / राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
अल्ताफ शेख – अपक्ष
बिलाल शेख – अपक्ष
उमेश मेहेत्रे – अपक्ष
सूर्यभान लांबे – अपक्ष/ काँग्रेस
रावसाहेब खेवरे – अपक्ष
अक्षय कर्डिले – भाजप
संभाजी धोंडे – अपक्ष
नागेश जाधव – अपक्ष
रवींद्र मोरे – अपक्ष
इम्रान देशमुख – अपक्ष
बाळासाहेब जाधव – अपक्ष / वंचित बहुजन आघाडी
संतोष चोळके – अपक्ष / वंचित बहुजन आघाडी
दत्तात्रय म्हैस – अपक्ष
त्रिशला कांबळे – अपक्ष
शिवाजी कदम – अपक्ष
सखाहरी बर्डे – अपक्ष
प्रवीण दळवी – अपक्ष
नामदेव पवार – अपक्ष
अनिल जाधव – अपक्ष
सुदर्शन शितोळे – अपक्ष / हिंदू एकता आंदोलन
बाळू कोळसे – अपक्ष
साहेबराव म्हसे – अपक्ष
अथर्व म्हसे – अपक्ष / काँग्रेस
नंदकुमार खेमनर – अपक्ष
महेश हापसे – अपक्ष
सोहम चिंधे – अपक्ष / लोकशाही पक्ष
प्रतिमा देसर्डा – अपक्ष
सविता शेटे – अपक्ष
शोएब शेख – अपक्ष




