Ashok Kharat : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

Ashok Kharat : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

0
Ashok Kharat : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ
Ashok Kharat : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

Ashok Kharat : संगमनेर : भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या विरोधात उघड होत असलेल्या विविध प्रकरणांनी आता गंभीर वळण घेतले आहे. महिलांचे शोषण (Exploitation of Women), आर्थिक फसवणूक, तसेच सावकारकीसारखे अनेक गुन्हे आधीच त्याच्यावर दाखल झालेले असताना, आता जमीन व्यवहारातील (Land Transactions) नवे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ४२ अर्ज दाखल

१७ गुंठे जागा अशोक खरातने खरेदी केली

संगमनेर शहरालगत अकोले बायपास शेजारी आणि गुंजाळवाडी हद्दीत असलेल्या सर्व्हे नंबर १३५/१६७ मधील सुमारे १७ गुंठे जागा अशोक खरात याने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ही जमीन मणियार यांची असल्याचे सांगितले जात असून ती सुमारे ७० लाख ५० हजार रुपयांना विकण्यात आल्याचे समजते. या व्यवहारात सुनील नावाच्या व्यक्तीने एजंट म्हणून भूमिका बजावल्याचेही उघड झाले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वाद सुरू असतानाही खरातने खरेदी केली जमीन (Ashok Kharat)

महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधित जमिनीवर आधीपासूनच वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. असे असतानाही खरात याने ही जमीन खरेदी केल्यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. यामुळे हा व्यवहार जाणूनबुजून केला गेला का, याची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पुंड नावाच्या व्यक्तीने या जमिनीवर दावा करत मोठा ट्विस्ट आणला आहे. त्यांनी या ठिकाणी अशी कोणतीही जमीन अस्तित्वात नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जमीन अस्तित्व, मालकी हक्क आणि व्यवहाराची वैधता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या अशोक खरात याच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप जोडला जाण्याची शक्यता आहे.

एकीकडे गुन्ह्यांची मालिका आणि दुसरीकडे वादग्रस्त जमीन व्यवहार, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या अशोक खरात याच्याभोवतीचे वर्तुळ अधिकच घट्ट होत चालले आहे. येणाऱ्या काळात या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्ही कधीही अशोक खरात याला पाहिलं नाही.. त्याला आम्ही ओळखत नाही. एका मध्यस्तीने व्यवहार केला. खरात आणि त्याची मुलगी स्वतः खरेदीला आले होते. गुंजाळवाडी शिवारात जागा आहे. ७० लाखांचा तो व्यवहार झाला आहे.

– सतिश मणियार, जागा मालक

मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात संगमनेरमध्ये जागा असल्याचे म्हटले होते त्यावर मी शोध घेतला असता सर्व्हे नं १३५ हा खूप मोठा परिसर असून ९ ते १० किलोमीटरचा परिसर आहे. वडिलोपार्जित जागा असताना देखील तिथे अशोक खरात याने त्याची मुलगी सृष्टी हिच्या नावावर मणियार यांच्याकडून १७ गुंठे जागा विकत घेतल्याचे समजले. त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की, अशी कोणतीही जागा याठिकाणी उपलब्ध नसताना देखील हे खरेदी झाली कशी तसेच ज्याने कोणी मध्यस्थी केली असेल किंवा ज्याने खरेदी करून दिली त्यची चौकशी करावी.

– संगीता पुंड, छावा संघटना