
Local Crime Branch : नगर : संगमनेर शहरातील मदीनानगर परिसरात कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेल्या ९ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) सुटका केली असून, या कारवाईत सुमारे ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अली अब्दुल अली कुरेशी (वय-३३ रा. ता.संगमनरे), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ४२ अर्ज दाखल
९ जनावरे अमानुष परिस्थितीत आढळली
मदीनानगर भागात काही गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या बांधून ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकून घटनास्थळी कारवाई केली. या वेळी ९ जनावरे अमानुष परिस्थितीत आढळून आली. पोलिसांनी त्यांची तत्काळ सुटका करून सुरक्षित ठिकाणी हलवले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बेकायदेशीर कत्तलवर पोलिसांनी कठोर भूमिका (Local Crime Branch)
या प्रकरणी मोहम्मद अली अब्दुल अली कुरेशी (वय ३३, रा. भारतनगर, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, बेकायदेशीर कत्तल प्रकरणांवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, राहुल ढोके, चालक चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.


