Rahuri Assembly By-Election | राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सात उमेदवारांचे अर्ज बाद

0

Rahuri Assembly By-Election | नगर : राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Rahuri Assembly By-Election) काल (ता. ७) अर्ज छाननी प्रक्रिया झाली. यात सात उमेदवारांचे अर्ज बाद झाले. तर एका उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात २२ उमेदवार उरले आहेत. आज (ता. ८) व उद्या (ता. ९) असे दोन दिवस अर्ज माघारी घेता येणार आहेत. उद्या (ता. ९) दुपारी तीन वाजेनंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

हे वाचा – ‘महावितरण’चा आयपीओ येणार; कृषी वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी

अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण (Rahuri Assembly By-Election)

या निवडणुकीसाठी ३० जणांनी ४२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. राहुरी येथे तहसील कार्यालयात मंगळवारी (ता.७) सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अनुपसिंग यादव यांनी उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अमित पवार, नायब तहसीलदार संध्या दळवी, सोपान बाचकर, नायब तहसीलदार (निवडणूक शाखा) अनिल बडे, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ४२ अर्ज दाखल

उमेदवारी मागे (Rahuri Assembly By-Election)

आवश्यक प्रस्तावकांच्या सह्या नसणे, अनामत रक्कम नसणे, नामनिर्देशनपत्र परिपूर्ण नसणे, अशा कारणांमुळे उमेश महादेव म्हेत्रे, दत्तात्रय नारायण म्हैस, त्रिशला मिलिंद कांबळे, शिवाजी आनंदा कदम, नंदकुमार भागवत खेमनर, सोहम बापूसाहेब चिंधे, मोहम्मद शोएब सुभेदार शेख यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले. प्रवीण सुभाष दळवी यांनी उमेदवारी मागे घेतली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

निवडणूक रिंगणातील उमेदवार असे अक्षय शिवाजीराव कर्डिले (भाजप), गोविंद खंडू मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), संतोष एकनाथ चोळके (वंचित बहुजन आघाडी), अथर्व साहेबराव म्हसे, अनिल भिकाजी जाधव, अल्ताफ इन्नाहिम शेख, बाळू बाबुराव कोळसे, नागेश विलास जाधव, बाळासाहेब सोमा जाधव, इमाम नबी देशमुख, संभाजी लक्ष्मण धोंडे, नामदेव बंडू पवार, प्रतिमा किशोर देसर्डा, सखाहरी शांताराम बर्डे, बिलाल गफूर शेख, रवींद्र बापूसाहेब मोरे, रावसाहेब सदाराम खेवरे, सुदर्शन लक्ष्मण शितोळे, सविता रामचंद्र शेटे, साहेबराव पाटीलबा म्हसे, सूर्यभान दत्तात्रय लांबे, महेश केशव हापसे. गुरुवारी (ता. ९) उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here