Stock Market : नगर : इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध विराम (Iran-Israel and US Ceasefire) झाला. त्याची घोषणाही झाली. युद्धाच्या छायेखाली असलेल्या जगाला युद्धविरामच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. आज भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) एका मोठ्या उसळणीसह उघडला. प्री-ओपनिंग सत्रातच सेन्सेक्सने (SENSEX) तब्बल २७०० हून अधिक अंकांची ऐतिहासिक झेप घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दोन आठवड्यासाठी ही युद्धबंदी आहेत. त्यानंतर शेअर बाजार चमकला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये जवळपास 3.5 टक्क्यांची तेजी दिसली.
नक्की वाचा : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सकारात्मक संकेत
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षात युद्धविरामाची घोषणा झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली स्थिरता आणि जागतिक पुरवठा साखळी पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जगभरातील शेअर बाजारांनी या निर्णयाचे स्वागत केले. याचाच थेट परिणाम आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीवर दिसून आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सेन्सेक्समध्ये जवळपास 2822 अंकांची तेजी (Stock Market)
सकाळच्या सत्रात बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये जवळपास 2822 अंकांची तेजी दिसली. सेन्सेक्स 77,439 अंकावर ट्रेड करत होता. तर एनएसई निफ्टी 800 अंकांनी वधारला. निफ्टी 23,949 अंकावर ट्रेड करत होता. या काळात सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 कंपन्यांमध्ये तेजीचे सत्र दिसले.



