Assault on a Police Officer : कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराला मारहाण; पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Assault on a Police Officer : कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराला मारहाण; पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

Assault on a Police Officer : नगर : पारनेर तालुक्यातील देसवडे येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण (Assault on a Police Officer) झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) प्रवीण बाळकृष्ण कदम (वय ३५, रा. बोरसे, ता. वैजापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

पोलीस अमलदारांशी हुज्जत घालत शिवीगाळ

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अमलदार वैभव खेमनर हे देसवडे येथे तमाशा कार्यक्रमादरम्यान बंदोबस्तासाठी कर्तव्य बजावत होते. रात्रीच्या सुमारास प्रवीण कदम हा कार्यक्रमस्थळी आला. त्यावेळी त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना बॅरिकेटच्या बाजूला होण्यास सांगत उद्धटपणे वाद घालण्यास सुरुवात केली. यावर पोलीस अमलदारांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला असता तो काही वेळासाठी तेथून निघून गेला. मात्र, काही वेळानंतर तो पुन्हा घटनास्थळी परत आला आणि पोलीस अमलदारांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. यानंतर त्याने वैभव खेमनर यांना मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. गर्दीचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद (Assault on a Police Officer)

या घटनेनंतर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रवीण कदम याच्याविरोधात मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत.