ST Fare Hike : एसटी महामंडळाचा प्रवाशांना दणका;तिकीट दरात मोठी वाढ

0
ST Fare Hike : एसटी महामंडळाचा प्रवाशांना दणका;तिकीट दरात मोठी वाढ
ST Fare Hike : एसटी महामंडळाचा प्रवाशांना दणका;तिकीट दरात मोठी वाढ

ST Fare Hike : एसटी बस अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या बस सर्वसामान्य प्रवाशांसाठी आज देखील मोठा आधार असतात. एसटीचा प्रवास हा सुरक्षित आणि स्वस्त मानला जातो. त्यामुळे प्रवाशांचा एसटी बसच्या प्रवासावर विश्वास आहे. मात्र आता राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. एसटी महामंडळाकडून बसच्या भाड्यात हंगामी वाढ (ST Fare Hike) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळानं प्रवासी भाड्यात १० टक्क्यांनी वाढ (10 percent increase) केली आहे.

नक्की वाचा: भोंदू अशोक खरातने सख्ख्या नातलगांनाही फसवलं;परिवहन अधिकाऱ्यांच्या नावेही फसवणूक

१५ एप्रिलपासून नवीन दर लागू (ST Fare Hike)

महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच हैराण आहेत, त्यात आता राज्य परिवहन महामंडळाने देखील प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानं ग्राहकांच्या खिशावर याचा भार पडणार आहे. मात्र येत्या १५ एप्रिलपासून प्रवाशांकडून सुधारीत दराने तिकीट आकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यात प्रवाशांना १२ रुपये मोजावे लागतील. ही भाडेवाढ १५ एप्रिल २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, या कालावधीत साध्या बससाठी प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार आहे.

एसटीच्या भाडेवाढीवर प्रतिक्रिया देताना प्रवाशांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. ‘महिलांसाठी अर्ध टिकीट करता आणि इकडे प्रवास भाडे वाढवता, त्यापेक्षा एसटीच बंद करून टाका. श्रीमंत लोक एसटीने प्रवास करत नाहीत, भाववाढ ही गरिबांच्या खिशाला कात्री आहे.  तिकीटाची दरवाढ कमी करून गरिबांना दिलासा दिला पाहिजे, अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहेत.

अवश्य वाचा: ‘मागासवर्गीय समुदायाचे सदस्य असणे हा सरकारी नोकरीत सवलत मिळवण्याचा आधार नाही’- सर्वोच्च न्यायालय

उन्हाळ्यात प्रवाशांच्या संख्येत वाढ (ST Fare Hike)

सध्या मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक जण उन्हाळ्यात प्रवासाचा बेत आखत असतात. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. मात्र ऐन उन्हाळ्यात आता एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे. त्याचा मोठा फटका हा आता प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. प्रवाशांना आता या भाडे वाढीमुळे मोठी आर्थिक झळ बसणार आहे.