Serious Allegations Against the Police : अहिल्यानगर तालुका पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप; पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

0

Serious Allegations Against the Police | नगर : अहिल्यानगर तालुका पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह (Serious Allegations Against the Police) निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातग्रस्त वाहन सोडवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून उघडपणे लाच मागितली जात असल्याचा आरोप एका वाहनचालकाने केला असून, या प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त केला जात आहे.

हे वाचा – अशोक खरातची ‘स्पेशल २६’ स्टाईल! बनावट आधिकाऱ्यांकडून स्वतःच्या भक्तांवरच छापे; व्यावसायिक व उद्योजकांना घातला गंडा

निवेदनात म्हटले आहे की… (Serious Allegations Against the Police)

राजू चांगदेव कुटे (रा. गंगादेवी, ता. आष्टी, जि. बीड) यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या टेम्पोचा अपघात १४ फेब्रुवारी रोजी झाला. मात्र विलंबानंतर १८ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर तपासाच्या नावाखाली त्यांचे वाहन जप्त करण्यात आले असून, अद्याप ते सोडण्यात आलेले नाही.

अवश्य वाचा – चालू आठवड्यात पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणारे ५० ते ६० टँकर ठप्प होण्याची शक्यता

आर्थिक संकट कोसळले (Serious Allegations Against the Police)

याहूनही गंभीर बाब म्हणजे, वाहन सोडवण्यासाठी संबंधित तपासी अधिकाऱ्यांकडून थेट पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “इतरांकडून ३० हजार रुपये घेतले जातात, मात्र तुमच्याकडून १५ हजार रुपये घेतले जातील,” असे स्पष्टपणे सांगण्यात आल्याचा दावा कुटे यांनी केला आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही वाहन मुद्दाम अडवून ठेवले जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. हा टेम्पोच कुटे कुटुंबाचा एकमेव उदरनिर्वाहाचा आधार असल्याने, वाहन न मिळाल्यामुळे कुटुंबावर प्रचंड आर्थिक संकट कोसळले आहे. सततचा मानसिक ताण, आर्थिक हालअपेष्टा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे १३ मार्च २०२६ रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेमुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दरम्यान, तपासाच्या नावाखाली कोणतीही ठोस प्रगती न करता केवळ विलंब लावून तक्रारदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पुढे आला आहे. यामुळे संपूर्ण तपास प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर, संबंधित तपासी अधिकारी सरोदे तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्यांची बदली करावी अशी मागणी कुटे यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली आहे. तसेच, त्यांचे वाहन तात्काळ सोडण्यात यावे असे ही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here