Knife Attack | कायनेटिक चौकात चाकू हल्ला, एक गंभीर जखमी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

Knife Attack | नगर : अहिल्यानगर शहरातील वर्दळीच्या नगर–पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौक परिसरात रविवारी (ता. ५) रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास चाकू हल्ल्याची (Knife Attack) घटना घडली. या प्रकरणात प्रमोद उद्धवराव कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात चार जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा – अशोक खरातची ‘स्पेशल २६’ स्टाईल! बनावट आधिकाऱ्यांकडून स्वतःच्या भक्तांवरच छापे; व्यावसायिक व उद्योजकांना घातला गंडा

अचानक हल्ला (Knife Attack)

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कृष्णा दीपक खैरे, दीपक रावसाहेब खैरे आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे यांनी अनधिकृत पत्रा गाळे काढण्याबाबत महानगरपालिकेकडे केलेला अर्ज मागे घ्यावा यासाठी काही जणांकडून दबाव टाकण्यात येत होता. तसेच त्यांच्या भावाला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट होती. रविवारी फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. कायनेटिक चौकाच्या पुढे सर्व्हिस रोडवरून जात असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला.

अवश्य वाचा – चालू आठवड्यात पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणारे ५० ते ६० टँकर ठप्प होण्याची शक्यता

जीवे मारण्याचा प्रयत्न (Knife Attack)

यामध्ये दीपक रावसाहेब खैरे यांच्या सांगण्यावरून त्यांचा मुलगा कृष्णा दीपक खैरे आणि त्याचे दोन अनोळखी साथीदार यांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी कुलकर्णी यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here