Drawing and Poster Competition | नगर : जिल्हा पोलीस व निर्भया पथक, अहिल्यानगर शहर उपविभाग यांच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला व पोस्टर स्पर्धेतील (Drawing and Poster Competition) विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, मुख्याध्यापक संघटना अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील पंडित आणि अशोक डोळसे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. पोलीस मुख्यालय (कवायत मैदान) येथे झालेल्या या उपक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमानाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील एकूण ६७७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
हे होते पर्यवेक्षक
स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून अशोक डोळसे, नंदकुमार देशपांडे, अनामिका म्हस्के, राजेंद्र धस, गणेश नागपुरे आणि दीपिका राजेभोसले यांनी काम पाहिले. तसेच मोठ्या संख्येने पालकही कार्यक्रमास उपस्थित होते. इयत्ता १ ते ४ गटातील चित्रकला स्पर्धेत पार्थ भरत खेडकर याने प्रथम क्रमांक पटकावला, तर काव्या अभिजीत ढगे हिने द्वितीय आणि उत्कर्ष राजेंद्र वाघुळे याने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच अंगत प्रभाकर भावले, आराध्या प्रमोद शेकडे आणि मायरा रोहित वैरागर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर झाली.
अवश्य वाचा – चालू आठवड्यात पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणारे ५० ते ६० टँकर ठप्प होण्याची शक्यता
पारितोषिके जाहीर
इयत्ता ५ ते ७ गटात सानवी नंदूर लोणकर, हिने प्रथम, वृंदा सचिन घोडे हिने द्वितीय, तर श्रेयस दिलीप गाडे याने तृतीय क्रमांक मिळवला. पूजा योगेश ताटी, वेदांगी बाळासाहेब यादव आणि प्रवीण अनिल थिगळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. पोस्टर स्पर्धेच्या इयत्ता ८ ते १० गटात अपूर्व सागर नांदूरकर प्रथम, अनुष्का अशोक जाधव द्वितीय आणि श्रावणी बाळासाहेब मायकर तृतीय ठरले. साक्षी श्रीकांत आडेप, तन्मय चंद्रकांत पाटील आणि अपूर्वा नितीन खंडागळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात आली.
हे पहा – कोण आहे हा छोटा रॉकस्टार ?
महाविद्यालयीन गटात हरिष शेषराव चौधरी याने प्रथम, आदित्य राहुल गुंड याने द्वितीय आणि अर्चना योगेश ताटी हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच तन्मय योगेश पारखे, ईशा संतोष सादुल आणि रोहित कांतीलाल लोखंडे व पल्लवी अभय पुलगम यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. स्पर्धकांना देण्यात आलेली उत्तम दर्जाची चित्रकलेची साधने पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले. एकूणच हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



